प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना बाबत सरकारचा मोठा निर्णय! मोदी सरकारने घेतला हा निर्णय?

0
Pm Kisan Samman Nidhi Yojana

Pm Kisan Samman Nidhi Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Samman Nidhi Yojana : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा कारण सरकारने मोठा निर्णय घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये नक्कीच आनंद पसरला असणार आहे. राज्य सरकार अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली त्याबरोबर आता केंद्र सरकारने देखील हा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेला थेट पुढील पाच वर्षासाठी म्हणजे 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 3.15 लाख कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आली असून, चे अधिकृत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे.

कोट्यावधी शेतकऱ्यांच टेन्शन मिटलं

देशभरातील कोट्यवधी शेतकरी कुटुंबासाठी दरवर्षी ठराविक हप्त्यांच्या माध्यमातून मिळणारी ही मदत, त्यांच्या रोजच्या आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा आधार आहे. योजनेला मिळालेल्या या पाच वर्षाच्या मुदत वाढीमुळे ही योजना पुढील चालू राहील की नाही या चिंतेतून कायमची सुटका झाली आहे. पुढील पाच वर्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याच योजनेअंतर्गत नियमितपणे पैसे जमा होत राहणार आहे.

24 वा हप्ता कधी मिळणार?

त्यात पीएम किसान योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजे 24 वा हप्ता कधी येणार याची आतुरता लागली होती. परंतु आता याचा नेमकं काळ मुदत वाढ ही घोषणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हा 24 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली?

सध्या ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत तब्बल 23 हप्त्यांच्या माध्यमातून 4.47 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 23 व्या हप्त्याचा लाभ जवळपास देशभरातील 9.49 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. यातील आणखी एक लक्षीण्य बाब म्हणजे, या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमाण देखील मोठा आहे. प्रत्येकी चार शेतकऱ्यांमध्ये एक लाभार्थी शेतकरी महिला असल्यामुळे ही योजना खरच शेतकऱ्यांसाठी वरदानच म्हणावे लागेल.

सूर्य सरोवर योजनेलाही मुदत वाढ

सध्या केंद्र सरकारने फक्त pm Kisan या योजनेपूर्तीच घोषणा केली नाही. तर याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रधानमंत्री सुर्य सरोवर योजनेला देखील (PM SSY) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे शेतकऱ्यांशी संबंधित एकाच वेळी दोन महत्त्वाचे योजनेला केंद्र सरकारने पुढील वाटचालीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.

सध्या शेतकऱ्यांबाबत घेतलेले निर्णय पाहता शेतकऱ्यांसाठी एकंदरीतच हा आनंदाचा क्षण आहे. कारण राज्य सरकारने कर्जमुक्ती योजना आणि केंद्र सरकारची पी एम किसान योजना या दोन्ही आर्थिक आर्थिक योजनेमुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. एकीकडे जुन्या कर्जाचा बोजा हा हलका होत असताना दुसरीकडे पुढील पाच वर्षे नियमित मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा ही खात्री मिळाल्याने शेतकरी कुटुंबांना भविष्यातील नियोजनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

(टिप: वरील माहिती केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेवर आधारित आहे. हप्त्याचा नेमक्या तारखेबाबत अद्यावत माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!