राज्यातून पाऊस गायब परंतु, IMD चा मोठा इशारा नवीन अंदाज काय पहा!

0
IMD High Alert

IMD High Alert

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD High Alert : पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा नुकताच अपडेट जारी केल्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. गेले काही दिवसांपासून राज्याचे वातावरण काहीसे वेगळं पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात राज्यातून अचानक पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ होत आहे, परंतु पावसात पाऊस नसल्यामुळे हा फटका शेतकऱ्यांना बसतो का अशी चिंता सध्या व्यक्त केली जात आहे. IMD High Alert

अशातच, पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 24 तासात देशात हवामानात मोठा बदल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारसाठी देशातल्या अनेक राज्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असला तरी महाराष्ट्राचा यामध्ये समावेश आहे का नाही? हवामान प्रणालीचा प्रभाव पडतो का नाही पुढील 24 तासात वातावरण कसं तयार होणार याची माहिती पाहूया.

महाराष्ट्रासाठी नवीन अंदाज काय?

हवामान खात्याच्या नवीन अपडेटनुसार, महाराष्ट्रातील कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसात कोकण आणि गोव्यात सर्वत्र पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. विशेषता घाटमाथ्यावरती मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे असं स्पष्ट करण्यात आल आहे.

याच बरोबर महाराष्ट्र सोडता इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, उत्तर ओडिसा, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर उत्तराखंड ईशान्य भारतातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, चंदिगढ, दिल्ली, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब आणि सिक्कीम या राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी हवामान अंदाज जाणून घेऊन योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.

हा पाऊस किती दिवस राहणार?

हवामान खात्याचा अंदाजानुसार, अनेक भागात हा पावसाचा जोर थेट 21 ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पूर्व भारत, उत्तर प्रदेश, ईशान्य भारत आणि हिमालियन प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तमिळनाडूच्या उत्तरेकडील जिल्ह्यात 19 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहण्याची शक्यता असलेले राज्यातील नागरिकांनी आणि विशेषता घाटमाथा व कोकण भागातील राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस सावधदा बाळगणं आवश्यक आहे.

(टिप : वरील अंदाज हा भारतीय हवामान विभागाच्या अंदाज वर आधारित आहे योग्य अंदाज जाणून घेण्यासाठी आणि स्थानिक माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.)

हे पण वाचा : पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्रात होणार तुफान पाऊस हवामान खात्याचा नवीन अंदाज?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!