पावसाबाबत हवामान खात्याने दिली मोठी अपडेट! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार, राज्यात पाऊस पडणार? वाचा सविस्तर आंदाज

0
IMD Weather Forecast

IMD Weather Forecast

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Forecast : महाराष्ट्रासाठी एक मोठी चिंताजनक बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे पावसाबाबत. ऑगस्ट महिन्यात गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात मोठा पावसाची तुट पडलेली आहे. जुलैमध्ये राज्यभर चांगला पाऊस झाला परंतु आता ही तूट भरून निघणार का? गेल्या पंधरा दिवसापासून पावसाचा जोर ओसरल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. आता भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज काय? बंगालच्या उपसागरात तयार झालेले प्रणालीचा अंदाज काय जाणून घेऊया सविस्तर अंदाज. IMD Weather Forecast

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र?

सध्या भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल. आणि याच प्रभावामुळे उत्तरेकडील काही राज्यसह पूर्व भारतातील बहुतांश भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. मात्र या प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव सध्या पश्चिम बंगाल झारखंड या राज्यावर केंद्रित आहे. हवामान खात्याचा नवीन अपडेट नुसार, हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वायू दिशेने सरकत असून पुढे याचा प्रभाव बिहार राज्यावर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर मात्र या प्रणालीचा कोणताही थेट प्रभाव नसल्याने, राज्यात वादळी पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला जात असला तरी बहुतांश भागात मात्र हवामान कोरडच आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, कमी बाबाच्या केंद्राचं नेमकं स्थान हेच ठरवतं की त्याचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या प्रदेशावर होईल. सध्या हे क्षेत्र पश्चिम बंगाल ते उत्तर भारतापर्यंतच्या पट्ट्यात सक्रिय असल्याने, तिथेच पावसाची शक्‍यता सर्वाधिक आहे. जेव्हा असं कमी बाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा महाराष्ट्राचे एखाद्या भागात सक्रिय होत, तेव्हा त्याच्या लगतच्या प्रदेशात उंच ढगांची निर्मिती होऊन अल्पावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत असतो. सध्या राज्यावर अशा कोणत्याही प्रणालीचा प्रभाव नसल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहिला असं भारतीय हवामान खात्याने सांगितल आहे.

सध्या राज्यात पावसाची अत्यंत गरज आहे, खास करून मराठवाड्यात. या भागात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची मोठी तुट पडलेली आहे आणि शेतकऱ्यांना अत्यंत पावसाची गरज आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पाहत आहे कधी पाऊस पडणार, रानातील कामे देखील पूर्ण झाले आहे. आता शेतकऱ्यांना गरज आहे ती पावसाची. आता राज्यात पाऊस कधी हजेरी लावतो हे पाहण्यासारखे आहे. तसेच नवीन हवामान अपडेट आणि बातम्याच्या पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.

( टिप : वरील दिलेला हवामान अंदाज हा भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावर आधारित आहे योग्य अंदाज जाणून घेण्यासाठी IMD चा अधिकृत वेबसाईटवर जाऊन हवामान अंदाज चेक करा.)

हे पण वाचा: राज्यात या तारखेला हवामान खात्याचा मोठा इशारा! तुमच्या भागातील हवामान अंदाज जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!