पंजाबराव यांचा मोठा अंदाज; राज्यात लवकरात पावसाचा कमबॅक होणार, या भागातील शेतकऱ्यांना दिला मोठा इशारा

0
Panjab Dakh Havaman andaja

Panjab Dakh Havaman andaja

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjab Dakh Havaman andaja: राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी वेळ मिळाला परंतु मराठवाड्यात परिस्थिती वेगळीच पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अजून अपेक्षाप्रमाणे पाऊस झालेला नाही, त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काळजी लागलेली आहे. पाऊस कधी हजेरी लावणार याची वाट सध्या शेतकरी पाहत आहेत. अशातच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे राज्यातील ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे त्यांच्या हवामान अंदाज आकडे लक्ष लागलेले आहे. काय म्हणाले पंजाबराव हे एकदा समजून घ्यायला हवे. Panjab Dakh Havaman andaja

पंजाबरावयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे, पंजाबराव यांच्या हवामान अंदाज नुसार आतापर्यंत कमी झालेला पावसाचा बॅकलॉग परतीच्या पावसामुळे भरून निघण्याची शक्यता आहे. याशिवाय परतीच्या पावसाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा ही यामुळे वाढणार आहे. विशेष म्हणजे, या पावसाचा लाभ फक्त सध्या खरीप हंगामापुरता मर्यादित नसून, पुढे येणाऱ्या रब्बी हंगामालाही याचा फायदा होणार असल्याचं डख यांनी पष्ट केल आहे.

विदर्भासाठी पंजाबराव यांचा हवामान अंदाज (Punjabrao’s weather forecast for Vidarbha)

सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे पंजाबराव यांनी विदर्भासाठी एक महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे. या ठिकाणी चांगला पाऊस होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. हा पाऊस विशेषता सोयाबीन पिकासाठी जीवनदान ठरणार असल्याचाही त्यांनी नमूद केलं. म्हणजे पाणी अभावी संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक ठरू शकतो.

तसेच पंजाबराव पुढे माहिती देत असताना म्हणाले की, देशभरामध्ये जाणवणारा अल निनो धोका कायमस्वरूपी टाळायचा असेल, तर सरकारने मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण आणि इतर पूरक उपायोजना विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.

तर पंजाबराव यांच्या हवामानासोबत हवामान विभागाने देखील पुढील काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि काही ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. यवतमाळ सह काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचणे वाहतूक विस्कळीत होणे आणि झाडे कोसळण्याचा धोका हवामान विभागाने नमूद केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे आणि प्रशासनाच्या सूचनेकडे लक्ष ठेवावे.

हे पण वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पंजाब डक म्हणतात, राज्यात 28 ते 29 डिसेंबर दरम्यान या जिल्ह्यात अवकाळी पाऊस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!