आज हवामान खात्याने राज्यातील या 13 जिल्ह्यांना दिला मोठा हाय अलर्ट पहा सविस्तर माहिती

0
IMD Maharashtra Alert

IMD Maharashtra Alert

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Maharashtra Alert : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज देखील काही भागात पावसाची शक्‍यता असून, यामुळे भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज दिलेल्या अपडेट मध्ये भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) राज्यातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या अपडेट मध्ये कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा इशारा असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाकडून आणि हवामान खात्याकडून विनंती करण्यात आलेली आहे. IMD Maharashtra Alert

हवामान खात्याचा सविस्तर अंदाज काय ?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात रायगड जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरामध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्‍यता असल्यामुळे या भागातील नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणी हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. याशिवाय ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सातारा, घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाचा या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इथे अधून मधून जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : महाराष्ट्रात पावसाचा कहर, आणखी पुढची 24 तास धोक्याचे

तसेच विदर्भामधील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी देखील आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यासाठी हवामान खात्याने आज Yellow Alert दिलेला आहे. सोबतच वादळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना योग्य ते काळजी आणि दक्षता घेण्याचा आवाहन हवामान विभागाने दिले आहे.

विदर्भाला मोठा तडाका

सकाळी आलेल्या अपडेटनुसार, गेल्या काही दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच विदर्भात देखील मुसळधार पाऊस पडत आहे. या भागात मुसळधार पावसाने एक दुःखद वळण घेतला असून मागील 12 तासांमध्ये पुराच्या परिस्थितीमुळे वाहून गेलेल्या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा लोणी महामार्गावरील कुट्टी नदीच्या पुलाजवळ एक कार पाण्याच्या प्रवास वाहून गेली, तसेच एका आईसह तिच्या दोन मुलाचा मृत्यू झाला. याशिवाय भंडारा आणि वर्धा जिल्हा देखील प्रत्येकी एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचाही देखील या ठिकाणी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेल आहे. यामुळे येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी सावदगिरी बाळवणे आवश्यक आहे. नदी ओढे किंवा पुलावरून पाणी वाहत असताना तिथून वाहन नेण्याच्या प्रयत्न कधीही करू नये क्षणभराचा निष्काळजीपणा अशावेळी जीवघेणा ठरू शकतो.

( टिप: वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या अंतरावर आधारित असून स्थानिक प्रशासनाच्या माहितीवर आधारित आहे. पुढील इशारांसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!