पंजाब डख यांचा नवा अंदाज, शेतकऱ्यांनो नक्की पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh On Rain Update | राज्यात सध्या मान्सूनचा जोर काहीसा वसरला असला तरी पुढे परतीचा पाऊस मात्र चांगला धुमाकूळ घालणार असा दावा हवामान खात्याबरोबरच राज्यातील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केलेला आहे. यापूर्वी जून मध्ये कमी पाऊस आणि जुलैमध्ये जास्त पाऊस पडेल असं अचूक अंदाज त्यांनी दिले होते आणि आता सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस राज्यात जोरदार पडणार असं भाकित त्यांनी व्यक्त केल आहे. Panjabrao Dakh On Rain Update

PanjabRao Dakh Havaman Andaaz
PanjabRao Dakh Havaman Andaaz

आतापर्यंत पंजाबराव यांचा अंदाज खरा ठरला ?

डख यांनी आपल्या आधीच्या अंदाजाची आठवण करून देत सांगितला की, जून मध्ये पाऊस खूपच कमी राहिला आहे, परंतु जुलैमध्ये जास्त पडेल ऑगस्टमध्ये पुन्हा कमी होईल आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस जोरदार पडेल असं त्यांनी आधीच सांगितलं होतं. याची पहिले दोन टप्पे प्रत्यक्षात तंतोतंत जुळून आले आहेत. मात्र आता नुकताच त्यांचा एक अंदाज आला आहे. ज्यात मराठवाडा आणि विदर्भात पाऊस जास्त तर काही भागात कमी पडणार असल्याची माहिती दिली आहे. यावर स्पष्टीकरण देत असताना डक यांनी सांगितले की ऑगस्ट महिन्यात विशेषता 14 ऑगस्ट नंतर राज्यात एक मोठा पाऊस येणार आहे आणि हा अंदाज शेतकऱ्यांनी विशेष लक्षात घ्यावा असं आव्हान त्यांनी केलं.

पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी

पुढे बोलत असताना पंजाबराव यांनी यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील काही विशिष्ट जिल्ह्यांचा आवर्जून उल्लेख केला. यामध्ये सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्याचा काही भाग या भागातील शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिना आनंदाची बातमी घेऊन येणार आहे, कारण या भागात ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. एवढेच नाही तर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येणारा परतीचा पाऊसही याच पश्चिम महाराष्ट्राला चांगली साथ देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केले. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

हे पण वाचा : Punjabrao Dakh : 14 जून पर्यंत या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंजाबराव यांचा अंदाज

हा पाऊस कसा पडतो पंजाबराव यांनी उघडलं विज्ञान

पश्चिम महाराष्ट्रात हा पाऊस नेमका कशामुळे होणार याचा तांत्रिक स्पष्टीकरण पंजाबराव यांनी दिल आहे. विशाखापटनमच्या वरच्या बाजूला तयार होणारे कमी दाबाचे पट्टे साधारणपणे छत्तीसगड कडे सरकतात, तिथून मध्ये प्रदेश मार्गे गुजरातच्या दिशेने जातात. मात्र हाच पट्टा जर चेन्नईच्या जवळपास तयार झाला, तर त्याची दिशा बदलते तो तेलंगणाकडे जातो आणि तिथून महाराष्ट्राच्या दिशेने सरकतो. याच हवामान प्रणालीच्या हालचालीमुळे राज्यात पावसाचे नवे टप्पे तयार होतात असं त्यांनी स्पष्ट केलं.

20 सप्टेंबर नंतर वंचित जिल्ह्यांनाही मोठा दिलासा

या संपूर्ण अंदाज यातला सर्वात आशा दायक भाग म्हणजे 20 सप्टेंबर नंतर पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांना आतापर्यंत पावसाने हुलकावणी दिली आहे अशा वंचित भागात देखील मोठा पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितलं. त्यामुळे आत्तापर्यंतचा पावसाच्या प्रतीक्षात असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अंदाज मोठा दिलासा देणारा ठरतो. परंतु आता पंजाबराव यांचा हवामान किती खरा ठरतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

( टिप: वरील अंदाज हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी वर्तवलेला असून, तो अधिकृत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा वेगळा असू शकतो. अद्यावत व अधिकृत माहितीसाठी IMD च संकेतस्थळ जरूर चेक करा.)

Leave a Comment

error: Content is protected !!