Punjabrao Dakh : 14 जून पर्यंत या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंजाबराव यांचा अंदाज

0
Punjabrao Dakh Maharashtra Weather News

Punjabrao Dakh Maharashtra Weather News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjabrao Dakh Maharashtra Weather News | ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत एक अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता यांनी वर्तवलेली आहे. तर पंजाबराव यांनी दिलेला अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला हवामानाविषयी माहिती होईल.

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी धो धो पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला आहे.

त्यामुळे मराठवाड्यामध्ये पेरणीला वेग आलेला आहे. तसेच राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी झालेली पाहायला मिळत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी पावसाबाबत एक अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी दिलेले अंदाजानुसार 14 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

या 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता Punjabrao Dakh Maharashtra Weather News

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यामध्ये 14 जून पर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. या कालावधीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर,अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, लातूर, बीड ,धाराशिव, पंढरपूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये चांगला पाऊस पडणार अशी शक्यता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. उर्वरित राज्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडणार नाही परंतु 15 ते 16 जून दरम्यान पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते.

राज्यातील या भागात जोरदार पाऊस

राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दुष्काळाच्या अनेक झळा शेतकऱ्यांना सहन करावा लागत होत्या. काही ठिकाणी चारा प्रश्न तर काही ठिकाणी पाणी प्रश्न देखील उपस्थित झालेला होता. परंतु या पावसाने काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.

धाराशिव, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, परभणी, जालना, लातूर, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये दोन ते तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी बंधारे तुडुंब भरून वाहणार आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. पावसाने वसंत घेतल्यानंतर जमिनीत पावसाला पुन्हा सुरुवात होताच खरीप पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सर्वात प्रथम मागील वर्षाचा विचार केला तर मागील वर्षी पावसाला उशिरा झाली होती उशिरा सुरुवात झाल्याने राज्यामध्ये पेरणी ही उशिरा झाली परंतु अपेक्षित असा पाऊस देखील झालेला नाही. सरासरी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला.

परंतु यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. नदी नाले भरून वाहत आहेत तर दुसरीकडे धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असून शेती कामाला देखील वेग आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!