Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे, पावसाने आता चांगलंच मनावर घेतल आहे. अनेक ठिकाणी आता चांगली पावसाची हजेरी लागलेली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे, या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे. तर आत्ताच हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार राज्यात सोसायटीचा वारा आणि दुसरीकडे कोसळणारा अती मुसळधार पाऊस. बंगालच्या उपसागरात तयार झालेला अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव पुढच्या 24 तासात राज्यात मुसळधार ते अति मुसलदार पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमी वरती आज शुक्रवारी राज्यातील 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावरती रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे आज महाराष्ट्रातील 24 तास खरच खूप महत्त्वाचे राहणार आहेत. Maharashtra Weather Update
भारतीय हवामान खात्याने कोकण विभागात पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यात परिस्थिती अधिक चिंताजनक आहे असे म्हटले आहे. या ठिकाणी ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईकर यांना आजचा दिवस विशेष सावधानतेने घालावा अशी परिस्थिती आहे.
हे पण वाचा : मुंबईसह राज्यात मोठे चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा मोठा इशारा; वाचा सविस्तर माहिती
तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र नाशिकच्या घाटमाट्यासाठी परिस्थिती याहून अधिक गंभीर आहे. इथे अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबत थेट रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागांनी याच पार्श्वभूमी वरती कळकळीच आव्हान केल आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी अजिबात घराबाहेर पडू नये.
मध्य महाराष्ट्रात देखील धोक्याची पातळी वाढत चाललेली आहे. पुणे घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवसात या परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. म्हणजे या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांनी दोन दिवस विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, या साठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये मात्र तुलने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना कुठलीही काळजी करण्याची गरज नाही.
( टिप : वरील हवामान अंदाज हा भारतीय हवामान खात्याच्या अंदाजावर आधारित आहे. अद्यावत व अचूक माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.)