सोन खरेदीदारांसाठी सणासुदी आधीच एक मोठी अपडेट! आज १ तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे, पाहा तुमच्या शहरातला दर
Maharashtra City Gold Rate
Maharashtra City Gold Rate : सध्या महाराष्ट्र मध्ये घराघरा सध्या सणासुदीची चाहूल लागायला सुरुवात झालेली आहे आणि याच सणासुदीच्या मुहूर्तावरती आपल्याकडे मागच्या काळापासून पारंपरिक काही गोष्टी आहेत त्या पुढ चालू आहेत म्हणजे दाग दागिन्यांची खरेदी करणे गोडधोड करणं. याचं काळामध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. आज गुरुवारी 30 जुलै रोजी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली असून हा दिलासा दागिना खरीदरांसाठी खरंच महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी देखील निर्माण झाली आहे. Maharashtra City Gold Rate
सोन्याच्या दरात घसरण का?
देशांतर्गत बाजारामध्ये सोन्याचे दर कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय रुपयाची मजबूत झालेली स्थिती. रुपये मजबूत असेल तेव्हा परदेशी चलनात सोनं खरेदी करणे तुलनेने स्वस्त पडत याचा थेट फायदा सर्व व्यवसायकांना होतो आणि त्याचा हा फायदा शेवटी किरकोळ बाजारातील दरांमध्ये घसरण या स्वरूपात खरीदारांपर्यंत पोहोचतो.
गंमत म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये सध्या चित्र उलट पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 4,080.37 डॉलर पर्यंत वाढला असून ऑगस्ट डिलिव्हरी साठी अमेरिकन गोल्ड फ्युचर्स 40,78 डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिजर्व बँकेच्या जुलै पतधोरण बैठकीत व्याजदर 3.50 ते 3.75 टक्के या पातळीवर स्थिर ठेवले आणि व्याजदर स्थिर राहणं किंवा कमी होणं हे नेहमीच सोन खरीदारांसाठी मालमत्तेसाठी सकारात्मक संकेत मानले जाते.
तुमच्या शहरात आज सोनं किती ?
आज सोन्याच्या बाजारात मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 44 हजार 650 रुपये प्रति ग्रामवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 31 हजार 690 रुपये मोजावे लागतात. मुंबईत मात्र दिल्लीपेक्षा थोडं चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे 24 कॅरेट चा दर एक लाख 43 हजार पाचशे रुपये आणि 22 कॅरेट दर एक लाख 31 हजार 540 रुपये इतका आहे. चेन्नई, पुणे, बेंगलोर या शहरांमध्ये सोन्याचा दर तुलनेने वरच्या पातळीवर 24 कॅरेट साठी एक लाख 43 हजार पाचशे रुपये आणि 22 कॅरेट साठी एक लाख 31 हजार 540 रुपये असा राहिला आहे.
चांदीच्या भावात देखील बदल
सोन्याच्या भावासोबत चांदीने देखील आज ग्राहकांना थोडासा दिलासा दिला आहे. देशांतर्गत बाजारात आज चांदीचा भाव घसरून दोन लाख 34 हजार 900 रुपये प्रति किलोग्राम वर आला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात याच्या अगदी उलट चित्र दिसतंय मिळालेल्या, माहितीनुसार स्पॉट सिल्वर चा भाव वाढवून 58.20 डॉलर प्रति औंस पोचला आहे.
( टिप : वरील दिलेले दर सांकेतिक असून, प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफ व्यवसायाकडून त्या दिवशीचा नेमका दर पडताळून घ्यावा. यात जीएसटी व मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. )