१७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३१ जुलैपूर्वी जमा होणार पैसे? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, कर्जमाफीसाठी कोण पात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari karajmafi News 2026 : अखेर अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.  2024 निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिले होते. परंतु अडीच वर्षापासून शेतकऱ्यांनी कधी कर्जमाफी होणार आम्हाला कधी कर्जमाफी मिळणार वारंवार प्रश्न उपस्थित केला होता. काही ठिकाणी तर शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन देखील करण्यात आले. परंतु आता राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी समोर आलेली आहे. Shetkari karajmafi News 2026

पंढरपूर येथे आयोजित शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 च्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षा अंमलबजावणीला वेग आल्याची मोठी घोषणा केली. सहकार विभागाने आता तब्बल 17 लाख शेतकऱ्यांची पहिली मोठी यादी जाहीर केली असून, या शेतकऱ्यांना एकूण 13000 कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. त्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पीएम कृषी सिंचन योजना 2024 साठी ऑनलाइन अर्ज सुरू, त्वरित अर्ज करा. Pradhanmantri Krishi Sinchan Yojana

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 17 लाख शेतकऱ्यांची यादी आता प्रत्यक्ष प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर त्याची तत्काळ पडताळणी करून 31 जुलै पूर्वी या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमुक्तीचे रक्कम जमा करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यातील यादीच कामही सध्या वेगाने सुरू आहे असं त्यांनी म्हटल आहे.

या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकरींपासून करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करून त्यांना कर्जमुक्त करण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देखील सुपूर्द करण्यात आले आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घेण्यासाठी पात्र देखील करण्यात आले असून नवीन कर्जाची वाटप याच कार्यक्रमांमध्ये करण्यात आलं असेही त्यांनी सांगितले. असे कार्यक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केल आहे.

या शेतकऱ्यांना देखील 50 हजाराचा प्रोत्साहन अनुदान

राज्यातील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून परंतु जे शेतकरी नियमित कर्ज भरतात. त्यांच्या असा माध्यमातून प्रश्न उपस्थित केला जात होता. आम्ही नेहमीच कर्ज भरले आम्हाला कुठेच लाभ मिळाला नाही. परंतु आता या शेतकऱ्यांना समाधान करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन 50 हजार अनुदान देखील जमा केले जात आहे. असे राज्यातील एकूण 56 लाख शेतकऱ्यांना प्रोत्सन अनुदान स्वरूपात या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पष्ट सांगितले की, बँकांकडून येणारा आकडेवारीचाही पंचनामा करण्यासाठी थोडा वेळ लागला असला तरी या योजनेत एक  ही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही अशी देखील आश्वासन त्यांनी दिले.

आता शेतकऱ्यांनी पुढे काय करायचे?

सध्या शासनाच्या माध्यमातून कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे त्या गोष्टी एकदा समजून घ्या.

– तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये कर्जमुक्तीची यादी लागलेली असते त्यातील आपले नाव आहे का आधी येता पासून घ्या.

-आधार कार्ड बँक खाते लिंक असल्याची खात्री करा रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याने आधार कार्ड, बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे नसल्यास बँकेत जाऊन ते तातडीने करून घ्या.

– यादीमध्ये नाव नसल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास स्थानिक पातळीवरती तात्काळ तक्रार नोंदवा जेणेकरून पुढील यादीमध्ये दुरुस्त होऊ शकेल.

– एकदा जुन कर्ज माफ झाले की, शेतकरी लगेच नव्या पीक कर्जासाठी पात्र ठरतो. याचा फायदा घेण्यासाठी बँकेशी वेळीच संपर्क साधावा.

फडणवीस सरकारने शब्द पाळा

विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेलं कर्जमाफीचा आश्वासन पूर्ण करत असल्याचे नमूद करताना मुख्यमंत्री म्हणाले की ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही जनतेने भरभरून पाठिंबा दिला. पुढील पाच वर्षे कोणतेही निवडणूक नसतानाही दिलेला शब्द न मोडता देशातील सर्वात मोठे कर्जमाफी योजना जाहीर केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

Leave a Comment

error: Content is protected !!