वार फिरल ! आज रविवारी राज्यातील या 14 जिल्ह्यांना मोठा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Meteorological Department news  :  राज्यातील हवामान विभागाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती दिलेली आहे. आणि हा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण आजचा दिवस राज्यातील काही भागांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरामध्ये पावसाचा जोर तसंच राहणार आहे. तर काही ठिकाणी सरी आणि ऊन यांचा लपनडाव सुरू होणार आहे. मात्र आज 26 जुलै रोजी हे चित्र आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने गाठमाथा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार 14 ठिकाणी येलो अलर्ट दिला असून तीन ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर पुणे घाटमाथा परिसरामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.  Maharashtra Meteorological Department news

कोकणपट्टा समिश्र चित्र

कोकणातील पालघर आणि मुंबई मध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मात्र परिस्थिती जरा गंभीर आहे. इथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून हवामान खात्याने या ठिकाणी Yellow Alert जाहीर केलेला आहे. एक महत्त्वाची बातमी म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून मुसळधार अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात पुढील 5 दिवस होणार मुसळधार पाऊस! 5 जुलै ते 10 जुलै दरम्यान पावसाची हजेरी लावणार -पंजाबराव डख

तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक शहर, आणि नाशिक घाटमाता तसेच अहिल्यानगर या भागांमध्ये उद्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आव्हान शासनाकडून करण्यात आलेला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या मैदानी भागांमध्ये तुलनेने हलका पाऊस अपेक्षित आहे. तर कोल्हापूर मध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच संपूर्ण पट्ट्यातील सर्वात चिंताजनक भाग म्हणजे घाटमाथ परिसर. पुणे घाटमाथ्यावरती अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. राज्यातला आजचा सर्वात गंभीर इशारा हाच आहे. कोल्हापूर घाटमात्यासाठी येलो अलर्ट, तर साताऱ्याच्या घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी!

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये फक्त हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गेले काही दिवसांपासून या भागात मुसळधार पावसाचा कुठलाच इशारा देण्यात आलेला नाही. परंतु हलक्या सरी मुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळतोय. परंतु या ठिकाणी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.

विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी आज येलो जारी करण्यात आला आहे.  इथे वादळी वाऱ्यां सह विजांच्या कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे स्पष्ट आव्हान प्रशासनाकडून करण्यात आल आहे.

( टीप: वरील माहिती हवामाना विभागाच्या अंदाज वर आधारित आहे. अद्यावत आणि अचूक विचारांसाठी भरती हा म्हणे बघायचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)

Leave a Comment

error: Content is protected !!