Maharashtra Weather Update : आज राज्यातील 18 जिल्ह्यांना धो धो पावसाचा इशारा? तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पहा

0
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा वातावरण काही समजतच नाही, कारण गेल्या काय दिवसापासून वातावरणात सातत्याने होणारा बदल यामुळे शेतीवरती मोठा परिणाम होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून हा पाऊस शेतकऱ्यांसाठी खरोखरच दिलासादायक आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्याच्या हवामानाबाबत मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार नाशिक सह राज्यातील अनेक भागात पावसाने आज चांगलंच रौद्ररूप धारण केलं असून, गोदावरी नदीच्या पातळीतील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आल आहे. कोकण आणि गाठमाथा परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत असून, या भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. Maharashtra Weather Update

राज्यातील आज परिस्थिती पहा?

राज्यातील इतर परिस्थिती पाहता महाबळेश्वर मध्ये आज हंगाम मधील सर्वात कमी 18.5°c तापमानाची नोंद झाली आहे. यावरून पावसाने वातावरण किती गारवा निर्माण केला याची कल्पना येते. सातारा, रायगड, रत्नागिरी तसेच या घाटमाथा परिसरामध्ये आज अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर या घाटमाता परिसरामध्ये आणि गडचिरोली या भागांमध्ये सोसाट्याचा वारा सह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील आज पावसाने हजेरी लावली असून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना आज कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.

देशभरातील 18 राज्यांना इशारा

भारतीय हवामान खात्याने केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात मान्सून जोरदार मुसंडी मारणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी एक महत्त्वाचा इशारा म्हणजे पुढील 12 तासांमध्ये तब्बल 18 राज्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

त्यांच्या ताज्या अंदाजानुसार, आज उत्तर भारतापासून पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या अनेक राज्यांना हवामानाची स्थिती तीव्र राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात आधीच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून याचवेळी काही ठिकाणी 80 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागात तर गारपीट होण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

कोणत्या राज्यांना इशारा?

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्र सह 18 राज्यांना इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांना हवामान विभागाने पुढील काही तास महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनाच पालन करूनच घरा बाहेर पडावे.

(टीप: वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर (ImD) आधारित आहे अद्यावत व अचूक माहितीसाठी आयएमडीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!