IMD Weather Forecast : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा कहर IMD चा मोठा इशारा

0
IMD Weather Forecast

IMD Weather Forecast

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Forecast : राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली असून, राज्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आज चार ऑगस्ट रोजी हवामान अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे. भारतीय हवामान खात्याने ( IMD) आज राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच देशभरातील इतर राज्यांमध्ये देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याच्या अपडेटनुसार, देशभरात अनेक राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोमाने सक्रिय होणार आहे. महाराष्ट्र सह देशातील अनेक राज्यांना यासाठी पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आल आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर अंदाज IMD Weather Forecast

ईशान्य भारतात अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याचा अपडेटनुसार, देशात सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती ही ईशान्य भारतामध्ये निर्माण झाली आहे. आसाम आणि मेघालय मध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली असून, अरुणाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीचा अंदाज आहे. याशिवाय नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांना उद्या पावसाचा जोरदार तडाका बसण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : आज हवामान खात्याने राज्यातील या 13 जिल्ह्यांना दिला मोठा हाय अलर्ट पहा सविस्तर माहिती

पूर्व भारतात देखील पावसाचा जोर कायम

हवामान खात्याने पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार होणार अशी शक्यता वर्तवली आहे. झारखंडमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा असून बिहारमधील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि ओडीसामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, यामुळे या भागातील नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता?

गेल्या 24 तासांमध्ये राजस्थानच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी, तर पश्चिम भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस नोंदवला आहे. पाली जिल्ह्यातील जैतारन येथे सर्वाधिक 161 मिमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र आता सोमवारपासून जोधपुर, उदयपूर आणि कोटा विभागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तीन ते पाच ऑगस्ट या कालावधीत बिकानेर, शेखावाटी, जयपुर आणि भरतपूर विभागात मात्र हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसाची चार दिवस शक्यता

इतर राज्याप्रमाणे देखील महाराष्ट्रात त पुढचे चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याच पार्श्वभूमी वरती कोकण आणि गोव्यात पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ४ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

( टिप: वरील माहिती भारतीय हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित आहे. अद्यावत व अधिकृत माहितीसाठी IMD च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!