काय सांगता! सोन्याचे भाव 36 हजारांनी घसरले? सणासुदी पूर्वीच खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी

0
Gold Price August 2026

Gold Price August 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price August 2026 : जुलै महिना संपला आणि ऑगस्ट महिना लागला, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सणासुदीपूर्वी खरेदिदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे सोन्या-चांदीच्या भावाबाबत, आज गुड रिटर्न वर दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी सलग दुसऱ्या दिवशी सराफ बाजारामध्ये मोठी घसरण नोंदवली आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या या घसरणीमुळे सोन खरेदी करू इच्छित असणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा आहे. सध्या महाराष्ट्रात काय दर आहेत आपण एकदा जाणून घेऊया. Gold Price August 2026

महाराष्ट्रात आज सोन्याचा दर किती

Goodreturns वर दिलेल्या माहितीनुसार आज तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर 24 कॅरेट नुसार एक लाख 44 हजार 220 रुपये प्रति दहा ग्राम आहेत, तर 22 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 32 हजार 220 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच अठरा कॅरेट सोन्याचा दर एक लाख आठ हजार 160 रुपये प्रति दहा ग्राम आहे. हे दर मेकिंग चार्जेस आणि GST वगळून दिलेले आहेत, हे खरेदीदारांनी लक्षात घ्यावे. की दोन्ही खर्च समाविष्ट केल्यास, प्रत्यक्षात 22 कॅरेट सोन्य प्रति तोळा ( 10 ग्रॅम) 1,52,506 रुपयांना विकल जात आहे.

हे पण वाचा : बजेट आधीच सोने कडाडले! सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे सोन्याचे दर..

गेले काही दिवसातील बाजारातील परिस्थिती?

खरंतर सोनं म्हणजे एक अमूल्य धातू आहे आणि याच धातूबाबत गेले काही दिवसांपासून सातत्याने चढउतार सुरू आहेत. मागच्या तीन दिवसापासून सोन्याचे दर स्थिर राहिलेले आहेत, मात्र ते आधी जुलै महिन्याच्या शेवटी दोन दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 10,90 रुपयांनी महागलं होतं. आजचा दर सर्वोच्च उंचांक तुलनेत तब्बल 36 हजार रुपयांनी स्वस्त आहे. हा फरक लक्षात घेता खरेदीदारांसाठी ही एक चांगली संधी मानली जाऊ शकते. दुसरीकडे, याच वर्षी एक जुलै रोजी सोनं सहा महिन्यांच्या नीचाकी पातळीवर म्हणजे एक लाख 40 हजार 786 विकल जात होत.

दिल्लीत आजचे दर

राजधानी दिल्लीत आज सकाळी १० वाजताचे दर महाराष्ट्रापेक्षा किंचित जास्त आहेत:

२४ कॅरेट सोनं — १,४४,३७० रुपये प्रति १० ग्रॅम

२२ कॅरेट सोनं — १,३२,३५० रुपये प्रति १० ग्रॅम

१८ कॅरेट सोनं — १,०८,३१० रुपये प्रति १० ग्रॅम

चांदीचाही दर स्थिर

चांदीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, महाराष्ट्रासह दिल्लीतही आज चांदीचा भाव प्रति किलो २,३५,००० रुपये इतका नोंदवला गेला आहे. आज सलग सातव्या दिवशी चांदीचे दर स्थिर राहिले असले, तरी उच्चांकी पातळीच्या तुलनेत चांदी अजूनही मोठ्या फरकाने स्वस्त आहे.

( टिप : पुढील दिलेली सर्व माहिती गुड रिटर्न्स च्या अधिकृत वेबसाईट नुसार आहे. प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफ बाजारातील दर पडताळून घ्यावे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!