New Weather ForecastNew Weather Forecast
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Weather Forecast: नवीन वर्ष सुरू झाला असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरू होतानाच पहिल्या दिवशी काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या चिंतेमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हे हिरावून घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशाभरातील हवामानत सतत त्याने बदलताना होताना दिसत आहे. काय भागात ढगाळ हवामान तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही भागात पाऊस सुरू आहे. उत्तर भारतामध्ये कडक्याच्या थंडी सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील काही राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बमुळे देशासह राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. उत्तरेतील थंडी लाट कायम राहणार असून थंडीचा कडका आणखी तीव्र होणार आहे. तर दक्षिणेकडे मात्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने या राज्यांना दिला अलर्ट !

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्‍यता आहे. अनेक राज्यामध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पंजाब आणि हरणामध्ये पुढील दोन दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील या भागात होणार पाऊस

तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवससात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये हलका पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 17 तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात असा एकूण 22 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पुणे परिसरात पावसाची शक्यता.

पुणे शहर आणि परिसरात नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने रविवारी वर्तवलेला आहे. पुण्यात किमान तापमानाचा पारा 1.7 अंश सेल्सिअस वाढून 12.8 नोंदवला गेला आहे. पुढील पाच दिवसात तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअस पर्यंत वाढेल असे खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. शहरात आठ ते दहा दिवसांपासून थंडी कमी जास्त होत असल्याचे शिवाजीनगर येथील वेधशाळेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

दरम्यान कोकणात बुधवारपासून तर मध्य महाराष्ट्र गुलाल पासून पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा अभाव मुळे राज्यात थंडी कमी झाली किमान तापमानाचा पारा 11 अंश सेल्सिअस वर गेला आहे. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमानचा 14 अंश सेल्सिअस च्या वर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *