राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा बातमी समोर! पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार? पुढचे दोन आठवडे कसे असतील

0
IMD Weather Update Maharashtra

IMD Weather Update Maharashtra

IMD High Alert : राज्याच्या वातावरणाबाबत भारतीय हवामान खात्याने (IMD) एक नुकतीच अपडेट दिली असून, देशभरातील पुढील दोन आठवडे खूप महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये पुढील दोन आठवडे मान्सूनचा प्रभाव जाणवणार असून बहुतांश भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंद महासागरात आणि बंगालचे उपसागरात एकाच वेळी घडणाऱ्या हवामान हालचालीमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. सध्या दक्षिण पूर्वेकडील वारे पूर्णपणे सक्रिय नसले, तरी पूर्व हिंद महासागरावर वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हालचाली वेगाने वाढले आहेत आणि हीच बाब येत्या काळात पावसासाठी महत्त्वाची ठरणार आहे. IMD High Alert

पॉझिटिव्ह IOD तयार?

जागतिक हवामान मॉडेल्स, उपग्रह छायाचित्र आणि हवामान तज्ञांच्या ताज्या विश्लेषणानुसार, सध्या इंडियन ओशयन डयापोल (IOD) पूर्णपणे विकसित झालेला नाही. मात्र आगामी दिवसात अल निनो चा प्रभाव वाढल्यास, यातून पॉझिटिव्ह IOD तयार होण्याची शक्यता आहे. ही स्थिती भारतीय मान्सूनसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते, कारण पॉझिटिव्ह IOD मुळे अल निनो मुळे निर्माण होणारा दुष्काळ कमी किंवा पावसाचा धोका बऱ्याच अंशाने कमी होतो.

सध्या आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार देशातील सुमारे 66% भागात आत्तापर्यंत चांगला पाऊस झाला आहे, तर 30 टक्के भागात मात्र अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचा सर्व धारण कोटा पूर्ण करण्यासाठी देशाला अजून सुमारे 12 टक्के इतका तरी पावसाची गरज आहे.

सध्या भारतामधील वातावरणाची परिस्थिती पाहता पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याचे चित्र आहे. उत्तर आणि पूर्व भारतात पत्कालीन पावसाच्या प्रणाली सक्रिय होत असतानाच, मॅडेन जुलियन ओसिलेशन (MJO) हा आणखी एक मोठा चक्रकार हवामान पॅटर्न सध्या टप्प्यावर पोहोचला आहे, ज्यामुळे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात ढगांची निर्मिती वेगाने होऊन थोडक्यात, IOD आणि MJO या दोन स्वतंत्र मोठ्या हवामान प्रणाली एकाच वेळी अनुकूल दिशेने सरकत असल्याने, पुढील दोन आठवडे मान्सून राज्यात आणि देशभरात चांगलाच सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

या दोन प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे ज्या भागांमध्ये आतापर्यंत पावसाची तूट होती त्या भागात येत्या दोन दिवसात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळी आधीच चांगला झालेला भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

( टिप: वरील दिलेले सर्व माहिती जागतिक हवामान मॉडेल्स आणि हवामान तज्ञांच्या विश्लेषणावर आधारित आहे. अद्यावत व स्थानिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!