या ठिकाणी होणार देशातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन पहा कधी होणार पूर्ण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bullet Train Station : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच आता भारतामध्ये बुलेट ट्रेन सुरू होणार आहे त्यापूर्वी भारतात कुठे बुलेट ट्रेन स्टेशन होणार याची माहिती हाती आलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या भारतीय बुलेट ट्रेन प्रकल्प प्रत्यक्ष उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावरील भारतातील पहिला प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील वर्षी सुरु होणार असून, येथील एक महत्त्वाच स्टेशन आता जवळपास आकार घेण्याच्या मार्गावरती आहे. त्या स्टेशनचे नवे फोटो नुकतेच जाहीर झाले असून त्यावरूनच बांधकामाचा वेग स्पष्टपणे दिसून येत आहे. Bullet Train Station

15 ऑगस्ट 2027 रोजी धावणार पहिली बुलेट ट्रेन ( The first bullet train will run on August 15, 2027)

प्रकल्पाची तयारी सध्या पूर्ण जोमाने सुरू असून, 15 ऑगस्ट 2027 रोजी ही बुलेट ट्रेन प्रतेक्षात धावणार आहे असं नियोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील वडोदरा येथे उभारण्यात येत असलेल्या बुलेट ट्रेन स्टेशन आता आकार घेत असून, हे स्टेशन आतापासूनच भव्य दिसू लागला आहे.

बांधकामातला महत्त्वाचा टप्पा

वडोदरा या ठकाणी स्थानकांच्या बांधकामात नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. स्टेशनच्या मुख्य सरचनेसाठी काँक्रीट स्लॅब कास्टिंगचं काम पूर्ण झाल आहे. आता स्ट्रक्चर स्टील भीम आणि खांब बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्टेशनचा प्लॅटफॉर्म, छत आणि बाह्यरचना यांना अंतिम आकार देण्यासाठी हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या ठिकाणी हाय स्पीड रेल्वे कॉर्ड वरील स्थानकाचे बांधकाम हे नेहमीच्या पारंपारिक इमारतीपेक्षा लक्षणीय वेगळं आहे. वडोदरा स्थानकाचे बांधकाम आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि हेवी ड्युटी क्रेनच्या मदतीने केला जात आहे. स्टील इरिगेशन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बांधकामाला मोठी गती मिळत आहे शिवाय इमारतीला प्रचंड मजबूत आणि टिकाऊपणा मिळतो तो हाय स्पीड बुलेट ट्रेनच्या कंपन्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी अत्यावश्यक आहे.

आधुनिकतेसोबतच सांस्कृतिक ओळखही जपणार

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा स्थानकाची रचना केवळ आधुनिकच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही तितकीच समृद्ध असणार आहे. स्थानकाची बाह्य आणि अंतर्गत सजावट स्थानिक समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कलेपासून प्रेरित असेल, ज्यामुळे भविष्यात हे स्थानक वडोदरा शहराचं एक नवं ओळखचिन्ह बनण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील माहिती नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) दिलेल्या अद्ययावत माहितीवर आधारित आहे. प्रकल्पाच्या प्रगतीबाबत अधिकृत माहितीसाठी NHSRCL च्या संकेतस्थळाला भेट द्यावी.)

हे पण वाचा : देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकर धावणार, वाचा कसा असणार मार्ग

Leave a Comment

error: Content is protected !!