Gold Price Big Update: सोनं तब्बल 19,000 रुपयांनी स्वस्त होणार? खरेदीसाठी हीच योग्य वेळ का? जाणून घ्या बाजारातील संकेत
Gold Price Today
Gold Price Big Update | 3 मे 2025 मागील काही महिन्यांपासून अक्षरशः गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमती आता हळूहळू थंडावताना दिसत आहेत. देशभरात सोन्याचा दर एका टप्प्यावर 1 लाख रुपये प्रति तोळा गाठल्याने सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी ही जणू स्वप्नवतच झाली होती. मात्र आता, आर्थिक विश्लेषक आणि बाजारतज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते आणि तीही तब्बल 19,000 रुपयांची! Gold Price Big Update
सोनं पुन्हा परवडणार?
केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी केलेल्या अंदाजानुसार, येत्या 4 ते 6 महिन्यांत सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 80,000 ते 85,000 रुपयांदरम्यान येण्याची शक्यता आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर अनेक शहरांत 95,000 ते 97,000 रुपयांच्या घरात आहे, त्यामुळे ग्राहकांना यामध्ये मोठा दिलासा मिळू शकतो.
मागच्या आठवड्यातच 7,000 ते 8,000 रुपयांनी घट
सोन्याच्या किमतींमध्ये नुकतीच झालेली किरकोळ घसरणही या अंदाजाला पूरक ठरत आहे. मागच्या आठवड्याभरातच एका तोळ्याच्या दरात 7000 ते 8000 रुपयांपर्यंत घसरण झाल्याचे ट्रेंड दिसले आहेत. हाच ट्रेंड पुढे चालू राहिल्यास, पुढील महिन्यांत सोन्याचे दर अधिक स्वस्त होण्याची शक्यता अधिक बळावते.
जागतिक परिस्थितीचा परिणाम
सोन्याच्या दरावर जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा मोठा प्रभाव असतो. यापूर्वी रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणातील कडक भूमिका, तसेच इतर भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. मात्र आता हे तणाव थोडेफार कमी होत चालल्याचे संकेत आहेत. अमेरिका आणि रशियामध्ये शांततामय वाटाघाटींसाठी प्रयत्न सुरू आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणातील लवचिकता ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील ट्रेंड
जगभरातील बाजारातही सोन्याचे दर मागे फिरताना दिसत आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात स्थैर्य राखल्यामुळे डॉलर मजबूत झाला आहे, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी इतर पर्यायांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोन्याची मागणी काहीशी कमी झाली असून, याचा थेट परिणाम किमतींवर होत आहे.
आजचे सोन्याचे दर (3 मे 2025)
गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, भारतातील प्रमुख शहरांमध्ये आजचे दर पुढीलप्रमाणे आहेत:
22 कॅरेट सोनं (प्रति 10 ग्रॅम):
पुणे – ₹87,550
मुंबई – ₹87,550
नागपूर – ₹87,550
24 कॅरेट सोनं (प्रति 10 ग्रॅम):
पुणे – ₹95,510
मुंबई – ₹95,510
नागपूर – ₹95,510
सध्या सोनं खरेदी करायची इच्छा ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी पुढील काही महिने अत्यंत महत्वाचे ठरू शकतात. जर केडिया यांचा अंदाज खरा ठरला, तर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बचत करता येऊ शकते. लग्नसराईचा हंगाम हळूहळू जवळ येतोय आणि दागिन्यांची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी दर घटण्याची संधी मिळाल्यास ती सोडू नये, असा सल्ला अनेक आर्थिक विश्लेषक देत आहेत.
हे पण वाचा | नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याची किमती घसरल्या, सोने खरेदी करण्याची ही संधी सोडू नका
