महाराष्ट्रावर अवकाळी संकट! या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली कायमच…

0
Weather Update

Weather Update

Maharashtra Weather Today : राज्यभर उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच आता हवामान विभागानं दिलेला अलर्ट चिंता वाढवणारा ठरतोय. 3 ते 10 मे दरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे, अनेक भागांत उन्हाची तीव्रता अद्याप कायम राहणार आहे.Maharashtra Weather Today

कुठे होणार पाऊस?

संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, तसेच विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पुढील सात दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी गडगडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवली आहे. गारपिटीचा धोका देखील हवामान खात्यानं नाकारलेला नाही.

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रविवारी सकाळी आकाश ढगाळ राहील, तर दुपारी आणि संध्याकाळनंतर काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. या पावसामुळे उकाड्यातून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

तापमानाची स्थिती काय?

सध्या राज्यातील बहुतांश भागांत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पुढील आठवड्यात तापमान दोन अंशांनी खाली येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मात्र, उष्णतेची लाट अथवा रात्री उकाड्याचा त्रास अशी स्थिती सध्या नाही. Maharashtra Weather Today

हवामान बदलामागचं कारण काय?

ईशान्य राजस्थानात समुद्रसपाटीपासून सुमारे 3 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम थेट महाराष्ट्रापर्यंत जाणवत असून, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. त्यामुळे पावसाचे ढग तयार होत असून हवामानात सतत चढ-उतार जाणवत आहेत.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा या हवामान बदलाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. विशेषतः कांदा, भाजीपाला, फळबागा यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या इशाऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून पिकांचं संरक्षण करावं, असं आवाहन करण्यात येत आहे.

हे पण वाचा : Monsoon Alert Maharashtra | या 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; भारतीय हवामान खात्याची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!