Snake gavati chaha: सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये वातावरण हा हिरवा गार झालेला आहे. पावसाळा महाराष्ट्र साठी खूप महत्त्वाचा असतो हा हिरवेगार वातावरण आणि डोंगरदर्यातून वाहणारे पाणी हे खूप भारी वाटतं. यासोबतच आपल्या आसपास देखील हिरवगार वातावरण तयार होतं. हेच वातावरण काही आपल्याला धोके देखील निर्माण करू शकतात. आपल्या घराच्या आसपास देखील झाडे झुडपेय उगतात. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? याच पावसाळ्यामध्ये आपल्याला साप सर्वात जास्त पहिला का मिळतात. शेतावरती घरावरती बांधावरती अचानक दिसण्याचे प्रमाण का वाढते याचा कधी विचार केला आहे का?. याच्या मागचे दोन कारणे आहेत. जर ही समजून घेतली नाही तर आपल्या घराभोवती सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो आणि आपल्याला सावधता बाळगायला हवी हे लक्षात घेणे खूप आवश्यक आहे. Snake gavati chaha
पावसाळ्यातच साप जास्त का दिसतात?
पहिलं कारण म्हणजे पावसाळा हा सापांच्या प्रजननाचा हंगाम असतो. काही साप याच काळात अंडी घालतात, तर काही थेट पिल्लांना जन्म देतात. जोपर्यंत अंड्यांमधून पिल्लं बाहेर येत नाहीत, तोपर्यंत साप त्याच जागेच्या आसपास कायम वावरत राहतो त्यामुळे एखाद्या विशिष्ट भागात साप वारंवार दिसत असेल, तर तिथे त्याने अंडी घातलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरं कारण अगदी साधं आणि नैसर्गिक आहे पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पाणी शिरतं. यामुळे साप आपलं बीळ सोडून बाहेर पडतात आणि सुरक्षित, कोरड्या निवाऱ्याच्या शोधात इकडे-तिकडे फिरू लागतात. याच शोधादरम्यान ते अनेकदा मानवी वस्तीच्या जवळपास येऊन पोहोचतात.
परंतु एक गोष्ट लक्षात घेणे खूप गरजेचे आहे. साप पावसाळ्यात सगळीकडे ओलावा असतो यामुळे अंडी घालण्यासाठी कोणती जागा शोधतात. तर ते अशी खास जागा शोधत असतात जिथे पावसापासून आणि इतर धोक्यांपासून अंड्यांचं संरक्षण होईल. यासाठी काही विशिष्ट वनस्पती आणि झाड सापांना नैसर्गिक रित्या आवडतात. कारण सापांना जगण्यासाठी सतत आद्रतायुक्त वातावरणाची गरज असते आणि या वनस्पती नेमकं हेच वातावरण त्यांना तयार करून देत असतात.
यामध्ये एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे गवती चहा (Lemon Grass). यामध्ये गंमत अशी की हे झाड फक्त दोन वेगवेगळ्या परिणाम दाखवण्याचे काम करतात. याची वाढ मर्यादित आणि नियंत्रित राहते. त्यामुळे इथे सापांना फारसा धोका नसतो त्यामुळे सापांचा हा आवडता अड्डा असतो. तसेच इथे मात्र त्याची वाढ पूर्णपणे अनियंत्रित होते. दाटपानामुळे जमीन पूर्णपणे झाकून जाते आणि यामुळे खालच्या भागात कायम आद्रता टिकून राहते. हीच घनदाट, ओलसर आणि झाकलेली जागा सापांसाठी लपण्याचे आणि अंडी देण्याचा सुरक्षित ठिकाण बनते.
जर तुमच्या देखील घराभोवती जर अशी वनस्पती असेल तर त्याची त्वरित त्यांची छाटणी व त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून भविष्यातील धोका टाळता येऊ शकतो. पावसाळ्यात घराचा आसपासचा परिसर दात झुडप आणि उंच गवत असलेला भाग बनतो. त्यामुळे स्वच्छता का ठेवणे खूप गरजेचे आहे. अशा भागामध्ये काम करताना किंवा फिरताना योग्य सावधता बाळगणे खूप गरजेचे आहे.
( टिप: वरील माहिती सर्वसाधारण निसर्ग निरीक्षणावर आधारित आहे. साप आढळल्यास स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करू नये; स्थानिक वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा.)
हे पण वाचा : Snake : साप हे किती वर्ष जगतात ? व कोणत्या जातींच्या सापाचे आयुष्य हे सर्वात जास्त असतं