Cotton Market | कापूस पिके हे महाराष्ट्रा सह देशभरामध्ये देखील उत्पादित केली जाते. सध्या महाराष्ट्र मध्ये जी परिस्थिती आहे ती देशभरामध्ये देखील आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कापूस पिकावर ती शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. देशभरामध्ये कापसाला काय भाव आहे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
गुजरात राज्य हे वस्त्रोद्योगासाठी मोठे नामांकित आहे. इथे कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. येथे कापसाला कमीत कमी 4750 ते जास्तीत जास्त पाच हजार 980 रुपये. तसेच सर्वसाधारण पाच हजार 250 रुपये इतका दर मिळत आहे.
हरियाणा मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकाचे उत्पादन घेतले जाते. इथे कापसाला कमीत कमी 4 हजार 700 तसेच जास्तीत जास्त 6 हजार 351 रुपये इतका दर मिळत आहे. आणि सर्व साधारण सहा हजार दोनशे रुपये इतका दर मिळत आहे.
कर्नाटक येथील विजापूर बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी दोन हजार सतरा रुपये ते जास्तीत जास्त सात हजार 69 रुपये इतका दर मिळत आहे. तसेच इथे सर्वसाधारण सहा हजार तीनशे बत्तीस रुपये इतका दर मिळत आहे.
पंजाब मधील बाजार समितीमध्ये कमीत कमी पाच हजार आठशे पन्नास रुपये दे जास्तीत जास्त 6313 रुपये इतका दर मिळत आहे. तसेच इथे सर्वसाधारण 5 हजार 500 रुपये इतका दर मिळत आहे.
तसेच तेलंगणा बाजार समितीमध्ये कमीत कमी सात हजार वीस तीस जास्तीत जास्त 7 हजार 20 तसेच सर्वसाधारण सात हजार वीस
हे देशभरातील बाजार भाव आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सहा हजार पाचशे ते जास्तीत जास्त सात हजार दहा रुपये इतका दर मिळत आहे.