E-pik Pahani News: 1 डिसेंबर पासून ई – पिक पाहणी प्रक्रिया सुरू आहे. पिक पाहणी हमीभाव केंद्रावर शेत माल विक्री तसेच नुकसान भरपाई मिळवण्यासाठी इ- पिक पाहणी करणे अनिवार्य असते. शेतकरी स्तरावरील नोंदणी करण्यासाठी फक्त 15 जानेवारीपर्यंतचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. E-pik Pahani News
ई- pik पाहणी प्रक्रिया
- यंदाच्या अरबी हंगामापासून ई-पीक पाहणी साठी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपचा वापर केला जात आहे. या याच्या माध्यमातून शेतकरी व सहाय्यक स्तरावरून पिकांची नोंदणी केली जाते. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन मोबाईल ॲप मध्ये पिकाची फोटो अपलोड करणे आणि संबंधित माहिती भरणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी सहाय्य
- ई-pik पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांना मदत करण्यासाठी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शेतकरी स्तरावरील ई पिक पाहणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित खातेदारांची नोंदणी संबंधित कर्मचारी त्यांच्या लॉगिनद्वारे पूर्ण करतील.
गाव नमुना 12 वर नोंदणी
- शेतकरी स्तरावरील पीक नोंदणीची 100% सहाय्यक स्तरावरून केली जाईल.
- सहाय्यक स्तरावरील नोंदणीची 100% पडताळणी ग्राम महसूल अधिकारी करतील.
शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदत नोंदणी पूर्ण करावी अन्यथा नुकसान भरपाई व अन्य लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.