Anganwadi Bharti: महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत तब्बल 18882 पदाची मेगा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी 5639 पदे ही अंगणवाडी सेविका पदासाठी आहेत. तर 13243 पदे ही अंगणवाडी मदतनीस पदासाठी घेतले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पदासाठी अर्ज कसा करायचा आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. अशा प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ते आपण जाणून घेऊया.
राज्यभरातील अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका पदासाठी भरती प्रक्रिया चालू झाली आहे. वेगवेगळ्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर तशा प्रकारच्या जाहिराती ही काढण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात? असा प्रश्न अनेक जणांना पडला आहे. 14 फेब्रुवारी ते दोन मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. Anganwadi Bharti
हे पण वाचा | शेवटची संधी! रेशन कार्डची KYC करा नाहीतर रेशन होणार कायमचे बंद..
कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?
- रहिवासी प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकारी यांचे विधवा चे प्रमाणपत्र
- शासकीय संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराचे बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस किमान बारावी उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
- डीएड पदविका बी एड पदविका असल्यास त्याचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
- उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र असल्यास.
- आधार कार्ड
हे पण वाचा | पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये…
अर्ज कसा करावा?
अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रियेचा वापर करून तुम्ही अर्ज करू शकतात.
सर्वप्रथम अंगणवाडी सेविका पदासाठी भरती निघाली आहे का नाही याची माहिती मिळवा. यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. तसेच शासनाच्या संबंधित वेबसाईटवर जाहिरात देखील पाहू शकतात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो. काही ठिकाणी अर्ज संबंधित कार्यालयात जाऊन करावा लागतो तर काही ठिकाणी पोस्टाद्वारे अर्ज पाठवावा लागतो.