Saturday

15-03-2025 Vol 19

अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना होणार बंद? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्पष्ट..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत. लाडकी बहिणी योजनेत वाढीव पैसे देण्याचे आश्वासन माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिले होते. त्यानंतर अजूनही रकमेत वाढ झाली नाही किंवा याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. या चर्चांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाहीतर आमच्या जीवनाचा आधार आहे. अशी भूमिका अनेक गोरगरीब महिलांनी सांगितली आहे. ही योजना कधीही बंद होणार नाही असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे. विरोधक जाणीवपूर्वक ही योजना बंद पडणार असल्याची टीका करत आहेत. मात्र गोरगरीब महिलांच्या कल्याणासाठी सुरू केलेली ही योजना मी बंद पडून देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा | अंगणवाडी सेविकांची 18882 पदाची मेगा भरती; आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा? जाणून घ्या..

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील दोन्ही भांडी काम करणाऱ्या 20 महिलांनी श्रमाचे आनंदवारी या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. यावेळी अनेक महिलांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. भांडी घासून मिळणारे पाचशे रुपयात कुटुंब कसं चालायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. पण लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला आधार मिळाला. असं एका वृद्ध महिलेने सांगितले आहे. हे सांगताना एका वृद्ध महिलेचा कंठ दाटून आला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले असेह देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. या पेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचा आम्ही विचार करत आहोत. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सन्मान निधी म्हणून मिळणारे दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत अशी विनंती महिलांनी केली आहे. त्यांच्या मागणीचा विचार करू असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. Majhi Ladki Bahin Yojana

हे पण वाचा | शेवटची संधी! रेशन कार्डची KYC करा नाहीतर रेशन होणार कायमचे बंद..

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंद वार्ता हीच आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधीच बंद होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. योजना बंद होणार नसली तरी योजनेअंतर्गत पडताळणी मात्र होणार आहे. पडताळणी दरम्यान ज्या लाडक्या बहिणी निकषा बाहेरच्या आहेत त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्या अगोदर सर्व पडताळणी पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Rushi

2 thoughts on “अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना होणार बंद? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्पष्ट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *