या जिल्ह्यांना गारपीट व अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मंजूर, यादीत तुमचे नाव पहा

0
Hail Damage Compensation

Hail Damage Compensation

Hail Damage Compensation: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. या परिस्थितीमध्ये राज्यातील बऱ्याच शेतकरी मित्राच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते. अशा सर्व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मंजूर झालेले रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधी मधील झालेल्या पावसामुळे शेती शेती पिकाचे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे. या नुकसान भरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 दरम्यान मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट पाहायला मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील सरासरी 22 जिल्ह्यातील शेती पिकाची नुकसान भरपाई नोंद करण्यात आलेले आहे. या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे.

अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती प्रकारचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान स्वरूपात एक हंगामात एक वेळेस या प्रमाणात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. Hail Damage Compensation

नोव्हेंबर 2023 मधील झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेली नुकसान किंवा पुढील कालावधीमध्ये अवकाळी पावसा गारपीट किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यात येणार आहे.

राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 24 कोटी 64 लाख 37 हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये चार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या चार जिल्ह्यातील पिकाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:- फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, पहा सविस्तर माहिती

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!