रेशन कार्ड हरवले? मोबाईलवर फक्त ५ मिनिटांत डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Digital Ration Card Download : सर्व शासकीय योजनेमध्ये वापरात येणार रेशन कार्ड (Ration Card) हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आपल्याला जर आरोग्य विषय असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा तसेच स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळवायचे असो या प्रत्येक टप्प्यावरती आता रेशन कार्ड ची गरज भासते. मात्र आणि हे कार्ड आपल्याकडून हरवले जाते किंवा खराब होते फाटते, आणि मग डुबलीकेट रेशन कार्ड साठी सरकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागतात. परंतु आता तुम्ही चकरा मारत असाल किंवा कार्यालयाची उंबरटे झिजवत असाल, तरी बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. कारण आता या डिजिटल युगामध्ये ही डोकदुखी संपलेली आहे केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेमुळे नागरिक घरबसल्या आता कोणत्याही शुल्काशिवाय अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपल्या मोबाईल वरती डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकतो. Digital Ration Card Download

या सुविधेचा वापर कसा करायचा आहे, डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड कसे करावे? How to download digital ration card?

केंद्र सरकारच्या डिजिटल भारत या मोहिमेअंतर्गत नागरिकांचे जीवन सुखकर व्हावं आणि शासकीय सेवा पारदर्शक व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने digilocker आणि UMANG या दोन वक्रत प्लॅटफॉर्मवर डिजिटल रेशन कार्ड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, या ॲप्समधील डिजिटल स्वाक्षरी असलेले रेशन कार्डाची पीडीएफ प्रति सर्व शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी मूळ रेशन कार्ड इतकीच वैद्य आणि कायदेशीर मानले जाते. त्यामुळे कागद कार्ड सोबत बाळगण्याचे गरज उरत नाही.

digilocker द्वारे रेशन कार्ड डाउनलोड कसे करावे?

  • यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर किंवा Apple प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करायच आहे.
  • आधी खात नसल्यास sing Up वर क्लिक करून नाव, जन्मतारीख मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून नवीन खाते तयार करायच आहे. आधी खात असल्यास मोबाईल नंबर आणि सहा अंकी पिन टाकून खात लॉगिन करा. होम स्क्रीनवर सर्च या बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर सर्च बार मध्ये रेशन कार्ड असं टाईप करा आणि यादीमधून तुमचं राज्याचं अन्न व नागरी पुरवठा विभाग निवडा. ( उदा. Food and Civil Supplies Department Maharashtra)
  • तुमच अधिकृत रेशन कार्ड क्रमांक आणि जिल्हा काळजीपूर्वक भरा. आणि शेवटी डॉक्युमेंट या बटणावरती क्लिक करून डाऊनलोड करा.

पद्धत २ UMANG अॅपवरूनही मिळवता येईल रेशन कार्ड

Play Store किंवा App Store वरून UMANG अॅप डाऊनलोड करा.

पहिल्यांदाच वापरत असाल तर ‘Register’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि आधार क्रमांकाच्या मदतीने खातं तयार करा. आधीच खातं असल्यास मोबाईल नंबर आणि MPIN किंवा OTP टाकून लॉगिन करा.

वरच्या सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘Food & Civil Supplies’ असं टाईप करून सर्च करा.

यादीतून तुमच्या राज्याचा अन्न व नागरी पुरवठा विभाग निवडा.

‘View Ration Card’ किंवा ‘Download Ration Card’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक भरा.

रेशन कार्ड व आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येणारा सुरक्षा OTP टाकून सबमिट करा.

पडताळणी पूर्ण होताच रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल ‘Download’ बटणावर क्लिक करून त्याची PDF प्रत मोबाईल गॅलरीत सुरक्षित ठेवा.

आता हे डिजिटल रेशन कार्ड केवळ ओळखपत्राचा एक पुरावा म्हणूनच उपयुक्त नाही, तर ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा लाभ घेण्यासाठीही हे अत्यंत महत्त्वाचं साधन बनलं आहे. रेशन कार्ड गहाळ होण्याच्या किंवा खराब होण्याच्या चिंतेतून यामुळे नागरिकांची कायमची सुटका झाली असून, वेळ आणि पैसा दोन्हींची मोठी बचत होते आहे.

हे पण वाचा : रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे/कमी करणे, नवीन रेशन कार्ड कसे काढायचे? पहा रेशन कार्ड बद्दल सर्व माहिती Food Supply Department

Leave a Comment

error: Content is protected !!