विहीर गोल का असते? कधी प्रश्न पडलाय का? जाणून घ्या याच्या मागची माहिती

0
Why is a well round?

Why is a well round?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Why is a well round? : तुमच्या शेतामध्ये तुम्ही विहीर पाहिले आहे का? नक्कीच तुम्ही पाहिली असेल विहीर पाहिली नसेल हा का प्रश्न आहे का? सर्वांना माहिती विहीर कशी आहे? तिचा गोलाकार आणि पाच ते सहा परस खोल. आपल्या शेतात, आपल्या गावात, शेजारच्या वाड्यात कुठेही बघा विहीर गोल असते. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का विचार चौरस का नसते? त्रिकोण, किंवा लांबट का नाही? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आपण याच प्रश्नाचे उत्तर समजून घेणार आहोत तेही अगदी आपल्या भाषेत, आपल्या पद्धतीने. त्या साठी digitalpor ला सोशल मीडिया, वेबसाईट वरती फॉलो करा. Why is a well round?

प्राचीन काळापासून आपण विहीर बांधत आहोत. याच विहिरीच्या माध्यमातून आपल्याला पाणी प्यायला मिळते. आपल्या आजोबा पंजोबा पासून विहीर रचून आपलं पाणीटंचाईचं दुःख मिटवलं. पण त्यांच्या ज्ञानामागे केवळ परंपरा नव्हे, तर अगदी ठोस शास्त्रीय कारण होतं. विहिरी गोल का रचली जाते? कारण गोलाकार सगळ्यात मजबूत आणि टिकाऊ असतो. त्यावर पाण्याचा आणि मातीचा दबाव सगळ्या बाजूंनी समान पडतो. एकही कोपरा नसल्यामुळे त्या रचने ताणतणाव वाटून घेतला जातो, त्यामुळे भिंती ढासळण्याचा धोका कमी होतो.

चौकोनी विहीर बांधली तर? हो, काही अपवाद आहेत राजस्थान, महाराष्ट्रात एखाद्या जुन्या बागायतीमध्ये किंवा पायऱ्यांच्या विहिरीत आपण चौकोनी रचना पाहतो. पण त्यांना नेहमी विशेष बळकटी द्यावी लागते. कारण त्या कोपऱ्यावर, ये क्या बाजूवर अधिक मातीचा ताण पडतो. पावसाळ्यात तर या बाजूने जमीन खचण्याचा धोका अधिक असतो. आणि त्यामुळे विहीर कोसळू शकते, म्हणूनच बहुतेक सर्व विहीर आजही गोल रचल्या जातात.

आपण जर ढोसळपणे बघितल, तर घरातलं कुंड, तांब, डोंगर, टाकी सगळं काही गोलसर असतं. कारण ते तुटत नाही, वाकत नाही, आणि वापरात सोपही असतं. हेच तत्व विहिरीवर लागू होतं. गोल विहीर ही केवळ सौंदर्याची बाब नाही. ती आपल्या जमिनीशी जुळलेली, निसर्गाच्या नियमांशी बांधलेली रचना आहे. हजारो वर्षांचा अनुभव ज्ञान आणि विज्ञान याचं मिश्रण म्हणजे ही गोल विहीर.

ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आवडली असेल, तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि डिजिटल पोरं पोर्टल आणखीच असे तुमच्यासाठी काही खास गोष्टी घेऊन येणार आहे त्यासाठी आम्हाला फॉलो करत चला.

हे पण वाचा| जगातल असे एक गाव, जिथे पावसात पडत नाही; तुम्हाला माहित आहे का हे गाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!