Tur Rate | मागच्या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने तूर उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे तुरीने चांगला दर गाठला आहे. परंतु कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच नवीन वर्षी देखील कापूस बाजार भाव मध्ये सुधारणार नाही. परंतु तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुरीच्या दारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वाधिक दर मिळाला ते सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (Tur Rate)
केंद्र सरकार द्वारे तुर बाजार भाव ने खरेदी करणार असल्याने तूर बाजारामध्ये तेजी आलेली आहे. सातत्याने दररोज तुरीमध्ये वाढ होत आहे. मागच्या आठवड्यामध्ये तुरीचे भाव दहा हजारांच्या खाली होते. परंतु आता तुरीच्या भावाने दहा हजाराचा टप्पा पार करून लवकरच 11000 चा टप्पा पार करणार आहे.
या बाजार समितीमध्ये तुरीला मिळाला सर्वाधिक दर (Turi got the highest rate in this market committee)
राज्यामध्ये सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, अकोला, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये तुरीला 9000 पेक्षा अधिक दर मिळत आहे. शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरीला नऊ हजार 455 रुपये तर, धाराशिव जिल्ह्यामध्ये 9418 रुपये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये 9000 238 रुपये व बीड जिल्ह्यामध्ये 9 हजार 30 रुपये तर अकोला जिल्ह्यामध्ये 9 हजार 13 रुपये हिंगोली जिल्ह्यांमध्ये 8921 रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ हजार 903 रुपये व वर्धा जिल्ह्यामध्ये 891 रुपये इतका दर मिळाला आहे.
परंतु सोलापूर मध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावामध्ये तुरीला सर्वात जास्त उंचअंकी दर मिळाला आहे. शुक्रवारी झालेल्या लिलावामध्ये मध्ये तुरीला दहा हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला आहे येथील शेतकऱ्यांनी दहा हजार दोनशे रुपयांनी तूर विक्री केली आहे. कमीत कमी आठ हजार आठशे ते दहा हजार दोनशे रुपये व तसेच सर्वसाधारण नऊ हजार सातशे रुपये दर मिळाला आहे.