Weather Updates : अचानक हवामानात झाला मोठा बदल; पुढचे 24 तास महत्त्वाचे, IMD ने दिला इशारा

0
Weather Updates

Weather Updates

Weather Updates : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड चढत होता. त्यातच अवकाळी पावसाने आज सकाळी हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह आसपासच्या भागांमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गारवा निर्माण झाला असून, काही भागांमध्ये प्रचंड गारवा जाणवत आहे. Weather Updates

कांजूरमार्ग, एरोली, मुलुंड, पनवेल सारख्या भागामध्ये हलक्या सरी कोसळल्या. गेल्या तीन ते चार तासात मुंबई MMR परिसरात वादळासह हलका पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. उष्णतेने त्रस्त नागरिकांसाठी हा एक दिलासा देणारा अनुभव ठरला आहे.

हवामान विभागाचा अंदाज: पुढे काय?

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तो पण किनारपट्टीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलका पाऊस होईल, त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अहमदनगर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी ची शक्यता आहे. ज्यामुळे तापमानात काहीशी घट होऊ शकते.

मराठवाडा आणि विदर्भातही दिलासा

मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली येथे हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, आणि बीड जिल्ह्यात मेगगर्जनासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

विदर्भात उष्णतेचा जोर कायम राहणार असला तरी नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये हलक्याचे मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मात्र अकोल्यासाठी उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

नागरिकांनी घ्यावी काळजी!

हवामानात होत असलेल्या बदलांमुळे अचानक उष्णता व पावसाचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिक स्वतःची काळजी घ्यावी, विशेषता प्रवास करताना किंवा बाहेर पडताना योग्य ती तयारी ठेवावी. गरज असेल तर छत्री किंवा रेनकोट बरोबर बाळगावा.

एकंदरीत, राज्यात उष्णतेच्या लाटे सोबत काही भागांमध्ये पावसाचे आगमन होत असून, हवामान विभाग सतत अपडेट देत आहे. त्यामुळे पुढचे 24 तास हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

हे पण वाचा | मान्सून महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचला? हवामान विभागाने दिली नवीन मोठी अपडेट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!