लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये एप्रिल चा हप्ता जमा झाला का? लगेच तुमचे खाते चेक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MukhyaMantri Ladki Bahin Yojana : महिलांसाठी मोठ्या गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून अखेर एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांना आजपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये १५०० रुपयांचा निधी जमा होऊ लागला आहे. त्यामुळे आपल्या खात्यावर पैसे आलेत का हे पाहण्यासाठी अनेक महिला बँक खातं चेक करताना दिसत आहेत.MukhyaMantri Ladki Bahin Yojana

मे महिना उजाडला तरीही एप्रिलचा हप्ता न मिळाल्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं. सरकारकडून ही योजना बंद होणार की काय, अशीही चर्चा काही भागांमध्ये रंगली होती. मात्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करत महिलांना दिलासा दिला. त्यांनी स्पष्ट केलं की, एप्रिलचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया २ मेपासून सुरू झाली आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसांत ही रक्कम सर्व लाभार्थींना मिळेल.

हे पण वाचा | या लाडक्या बहिणींचे खटाखट पैसे येणे बंद होणार! लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू..

या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. परंतु महायुती सरकारकडून निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच महिलांमध्ये अपेक्षेचं वातावरण होतं. मात्र प्रत्यक्षात अद्यापही हप्ता १५०० रुपयांचाच मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी असून, सरकार आपल्या आश्वासनावर ठाम राहणार का? याचीही उत्सुकता आहे.

मंत्री नरहरी झिरवळ यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाने नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांनी २१०० रुपये देण्याचं कोणतंही आश्वासन आम्ही दिलं नव्हतं, असं वक्तव्य करून एकप्रकारे सत्ताधाऱ्यांमध्येही योजनेच्या अंमलबजावणीवर मतभेद असल्याचं चित्र उभं केलं. त्यामुळे २१०० रुपये खरोखरच मिळणार की निवडणुकीपूर्वीचं ते एक राजकीय गाजर होतं, असा प्रश्न महिलांमध्ये निर्माण झाला आहे.

दरम्यान, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सरकार वेळेत पुढील हप्ताही देईल का, आणि महिलांना त्यांचं आश्वासन पूर्णत्वास नेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे पण वाचा |लाडकी बहीण योजनेच्या नियमात मोठा बदल! राज्य सरकारने लढवली नवीन शक्कल…

Leave a Comment