त्या फसव्या जाहिराती, कर्जमाफी मिळणार नाही, बँकेचे कर्ज भरावेच लागणार —RBI

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काही माध्यमातून कर्जमाफी करून देण्याची जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे. कायदेशीर फी भरून घेऊन कर्जमाफी प्रक्रिया करून देऊ असे दावे या जाहिरातून केले जातात. पण अशा जाहिराती पूर्णपणे फसवे असून, बँकेतील कर्ज कोणत्याही स्थितीत भरावे लागणार आहे, असा इशारा रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) दिला आहे.

कर्जदारांनी अशा जाहिरातींनी भिलू नये असे RBI ने म्हटले आहे.

अशा संस्था किंवा व्यक्ती वृत्तपत्रांतून आणि सोशल मीडियातून कर्जमाफीच्या जाहिराती करत आहेत. सेवाशुल्क आणि कायदेशीर फी भरून घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्रदेऊ, असे दावे या जाहिरातीतून केले जात आहेत. पण या संस्थांना असे कोणतेही अधिकार नाहीत.

काही ठिकाणी असे दिसून आले आहे की काही व्यक्तीही अशाप्रकारच्या जाहिराती करत आहेत. यामुळे कर्जवसुलीसाठी बँका करत असलेल्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. बँका आणि वित्तसंस्था यांची देणी नाही परतफेड केली तरीचालतात, असा समज या जाहिरातीतून करून दिला जात आहे. याचा अंतिमतः फटका ठेवीदारांना बसतो,” असे RBI ने म्हटले आहे.

हे पण वाचा:-तुमच्या जागा, जमिनीवर कोणी अतिक्रमण केलयं का? घाबरू नका, ‘येथे’ दावा दाखल केल्यास मिळेल हमखास न्याय; ‘या’ गोष्टी पाळा, अतिक्रमण होणारच नाही

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद….

1 thought on “त्या फसव्या जाहिराती, कर्जमाफी मिळणार नाही, बँकेचे कर्ज भरावेच लागणार —RBI”

Leave a Comment