Agrim Pik VimaAgrim Pik Vima
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agrim Pik Vima : राज्यातील २४ जिल्ह्यामध्ये खरीप हंगामत पावसाचा खंड या सर्व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले. त्याबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांना सुमारे 2216 कोटी रुपये इतका ग्रीन पिक विमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आलेला आहे.

त्यापैकी आज सकाळपर्यंत 1 हजार 690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले असून, 634 कोटी रुपयांच्या वितरण वेगाने सुरू आहे. अशी माहिती आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान सभागृहात दिली आहे.

२४ जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या लोकसभेला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना 25 टक्के अग्रिम पिक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना करण्यात आल्या होत्या.

मात्र त्या विरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावरील अपील केले होते. ते पेट्रोल लावल्यानंतर काही पिक विमा कंपन्यांनी राज्यस्तरीयंत्रांत्रिक सल्लागार समितीकडे अपील केले होते.

या दरम्यान राज्य शासनाच्या वतीने हवामान तज्ञ कृषी विद्यापीठांमधील तज्ञ व्यक्तींचे सहकार्य घेऊन 21 दिवसांच्या पावसाचा खंड नियमाला अनुसरून तसेच, विविध तांत्रिक बाबीच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे झाले. नुकसान कंपन्यापुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पाडले असे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पिक विमा दिला जाणार

काही विमा कंपनीचे अपील अद्याप सुनावणी स्तरावर त्यातील निकाली निघाल्यानंतर मंजूर पीक विम्याचे रकमेत आणखी मोठी वाढ होणार. असेही कृषिमंत्री यांनी स्पष्ट केलेले आहे. तर विविध जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी विमा रक्कम मिळण्याच्या बाबी काही सदस्यांनी उपस्थित केला.

त्यावर ज्या शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम 1000 रुपये पेक्षा कमी असेल, त्या शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये पिक विमा दिला जाईल, याबाबत कारवाई सुरू आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आहे

One thought on “राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ! 24 जिल्ह्यात 2216 कोटींचा अग्रीम पीकविमा मंजूर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *