मान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट!

0
Monsoon Update 2025

Monsoon Update 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update 2025 | देशात उन्हाची झळाळी अजूनही कायम असली तरी पावसाची चाहूल लागली आहे आणि यंदाचा नैऋत्य मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरत आहे. भारतीय हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेआधीच अंदमान समुद्रात पोहोचल्याचे जाहीर केले असून त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, तसेच दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात पोहचला आहे. त्याचबरोबर, हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सांगितले की, पुढील ४-५ दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात पोहचेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनची घोडदौड लवकर सुरु होईल, अशी शक्यता आहे. Monsoon Update 2025

तसेच, यावर्षी मान्सून केरळमध्येही वेळेआधी म्हणजे २७ मे रोजी पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामान्यतः केरळमध्ये ३१ मे रोजी मान्सून दाखल होतो, मात्र यंदा चार दिवस आधी येणार असल्याने देशभरात मान्सूनच्या आगमनाचा कालावधीही पुढे सरकणार आहे.

यावर्षीचा मान्सून 2008 नंतर प्रथमच नियोजित वेळेच्या आधी येणार आहे. १५ मेनंतर मान्सून अधिक वेगाने प्रगत होईल आणि दक्षिण अरबी समुद्र, श्रीलंकेचा काही भाग, संपूर्ण अंदमान बेट व्यापून टाकेल. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस नेहमीपेक्षा काही दिवस आधी सुरू होण्याची शक्यता प्रबळ आहे.

महाराष्ट्रात कधी मान्सून येणार?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

५ जून रोजी गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पाऊस पोहचेल,

६ जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल होईल.

त्यानंतर १० जून पर्यंत मुंबई, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस पोहचेल.

याशिवाय हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील दिला आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

अधिक पाऊस होणार का?

होय. हवामान खात्याने यंदा १०६% सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या २० वर्षांत २०१५ वगळता हवामान खात्याचे बहुतेक अंदाज अचूक ठरले आहेत. यंदा ‘अल निनो’ किंवा ‘ला निना’ अशा कोणत्याही स्थितीचा प्रभाव नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळा नियमित आणि भरपूर प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा | मान्सून महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचला? हवामान विभागाने दिली नवीन मोठी अपडेट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!