Mazi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत सध्या महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जातात. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचार सभेदरम्यान माहिती सरकारने हा निधी 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुका होऊन दोन महिने झाले तरी वाढीव रक्कम महिलांना मिळाली नाही किंवा याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार हाच प्रश्न महिलाद्वारे वारंवार विचारला जात आहे.
यावर उत्तर देताना महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांनी बजेट सादर झाल्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळतील असे संकेत दिले आहेत. परंतु अजून देखील याबाबत ठोस पत्रक किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांना वाढीव हप्त्याची रक्कम मिळेल का नाही असा प्रश्न देखील पडला आहे. अशातच आता राज्याचा अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर होणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे तीन मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. Mazi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता उशिरा मिळणार, पडताळणी पूर्ण झाल्यावरच खात्यात पैसे जमा होणार?
दरम्यान लाडकी भाई योजना बंद होणार असल्याच्या चर्चा देखील प्रसारमाध्यमांमध्ये रंगत होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांवर पूर्णविराम देत यावर मोठे वक्तव्य करून लाडकी बहिणी योजना कधीही बंद होऊ देणार नाही असे स्पष्टीकरण दिले आहे. याउलट आम्ही या योजनेत महिलांना आणखीन कशा पद्धतीने आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 रुपये चा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न मात्र अजून सुटला नाही. आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष हे सादर होणारे अर्थसंकल्पावर आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत होणाऱ्या घोषणांकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या रकमेचा आकडा वाढवण्यात येईल अशी आशा देखील महिलांच्या वतीने व्यक्त केली जात आहे. यामुळे आता राज्यभरातील महिलांचे लक्ष तीन मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2,100 रुपये? जाणून घ्या सविस्तर माहिती…
फेब्रुवारी महिन्यात आपका कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याची प्रतीक्षा लागली आहे. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 फेब्रुवारी रोजी च्या आसपास महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेची पडताळणी सुरू असल्यामुळे या तारखे मध्ये वाढ होऊ शकते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा