Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 100 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून अनेक महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. योजनेतील पात्र महिलांच्या घरी चर्चा किंवा असल्याची माहिती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यामुळे काही अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे आता लाभार्थी महिलांचा लाभ पडताळणी पूर्ण होईपर्यंत मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2,100 रुपये? जाणून घ्या सविस्तर माहिती…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी 59 लाख महिलांना लाभार्थी ठरवण्यात आले होते. या महिलांना दरमहा 385 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून द्यावा लागत आहेत. यामध्ये अशा काही महिला लाभार्थी आहेत त्यांना इतरही योजनेचा लाभ मिळत आहे. पण आता संजय गांधी निराधार योजना, नमो शेतकरी योजना आणि स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या पाच लाख 40 हजारापर्यंत पोहोचवली आहे. सध्या ज्या लाभार्थी महिलांच्या नावावर चार चाकी वाहन नाही त्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही. Mukhyamantri Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजना होणार बंद? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं स्पष्ट..
विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र काही महिन्यातच योजने संदर्भात काही तक्रारी समोर येऊ लागल्या. त्यानंतर आता निकषानुसार किती महिला अपात्र होत आहेत. याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये लाभार्थ्यांकडे चार चाकी वाहनाची पडताळणी केली आहे. अंगणवाडी सेविकांना संबंधित महिलांच्या नावाच्या याद्या देण्यात आल्या होत्या त्यानुसार पडताळणीचा अहवाल आठ दिवसाच्या आत शासनाला सादर करायचा आहे. त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारी चे पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यासाठी मार्च महिना देखील लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे आता लाडक्या बहिणीच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ देखील थांबवण्यात आला आहे.
हे पण वाचा | अंगणवाडी सेविकांची 18882 पदाची मेगा भरती; आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा? जाणून घ्या..
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फटका इतर योजनेला बसल्याचे चित्र दिसत आहे. अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या कर्जाला कात्री लागत आहे. महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाचा सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आला आहे. राज्यातील विविध विभागांना किती निधी खर्च करण्यात यावा या संदर्भात अंदाज लावून देण्यात आला आहे. एकूण वार्षिक तरतुदीच्या 70 टक्के निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पडताळणीमुळे उशिरा महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा