लाडक्या बहिणींच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये या दिवशी जमा होणार; जाणून घ्या तारीख आणि वेळ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? याकडे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मागील काही दिवसापासून या या योजनेच्या अर्जाची तपासणी करण्यात येत आहे. अर्जाची पडताळणी चालू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा येऊ शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होते. पण राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडके बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची खुशखबरी दिली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याची तारीख अजित पवार यांनी जाहीर केली आहे.

अजित पवार यांनी शनिवारी जालन्याच्या दौऱ्यावर असताना, आपल्या भाषणात बोलताना राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी खुशखबरी दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या आठ दिवसात खात्यात येईल असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना 25 फेब्रुवारी च्या आधी खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. पुढच्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या अगोदर सरकार राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 100 रुपये जमा करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे; अजित पवारांनी केले मोठं वक्तव्य..

पुढील महिन्यात 2100 मिळणार का?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महायुतीच्या बड्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले, तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पुढील महिन्यात तीन मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत महत्त्वाची घोषणा होणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 2100 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींना 2,100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..

या महिला होणार अपात्र

मागील काही दिवसापासून या योजनेची पडताळणी केली जात आहे. अपात्र महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत. आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या राज्यातील सहा लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्या सर्व महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार नाही. अपात्र ठरवलेल्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. चार चाकी घरात असणाऱ्या सर्व महिलांचे अर्ज लाडकी बहिणी योजनेतून बाद करण्यात आले आहेत. Ladki Bahin Yojana

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये या दिवशी जमा होणार; जाणून घ्या तारीख आणि वेळ?”

Leave a Comment