Lok Sabha Election 2024 Update | आगामी लोकसभेसाठी आता सर्वत्र वारे सुटू लागले आहेत. येत्या लोकसभेसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आता लोकसभेसाठी पहिल्यांदाच घरी बसून करता येणार मतदान, मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली महत्त्वाची माहिती.
2024 चे वर्ष निवडणुकीचे वर्ष असणार आहे. सध्या आता याच लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभेसाठी वातावरण तयार होतानाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या आगामी निवडणुकीमध्ये आता पहिल्यांदाच घरी बसून मतदान करण्यात येणार आहे. याला परवानगी देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
त्यांनी दिलेला माहितीप्रमाणे लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहेत. परंतु लोकसभेची वारे सर्वत्र सुटले असता दोन-तीन महिन्यापूर्वीच वातावरण निर्मिती तयार झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणुकांच्या तारखा बद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी सांगितले की सध्या जिल्ह्यातील निवडणूक कार्यालयांना भेट देणे सुरू आहे. पुण्यात पहिली भेट यावेळी तयारी पाहणी दौरा तसेच आडवा बैठक घेतल्याचे श्रीकांत देशपांडे म्हणाले.
या आगामी निवडणूक मध्ये काही धोरणात्मक बदल झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले. येथे आगामी लोकसभे निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच घरी बसून मतदान करता येणार असल्याचे म्हटले आहे.
त्यासाठी परवानगी देखी देण्यात आली आहे 80 वर्षापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती यांना आता घरी बसून मतदान करता येणार आहे असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.
निवडणुका जाहीर झाले की लगेच 12ड फॉर्मुला लोकांना पर्याय निवडणुकीसाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. त्यांच्याकडून ऑप्शन घेऊन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे मतदान होईल त्या अगोदर त्यांचे मतदान करून घेण्यात येणार आहे. मतदानात मोठा उत्सव आहे मतदान केंद्रावर येऊन करण्यासाठी आम्ही वृद्धांना सांगणार आहोत. त्यांच्याकडे पाहून मतदानाला लोके बाहेर पडतील असे देशपांडे यांनी सांगितले.
तसेच यावेळी त्यांना घरी बसून मतदान करण्याचा देखील पर्याय उपलब्ध असणार आहे. कसबा पोट निवडणूक मध्ये देखील हा पर्याय देण्यात आला होता असे त्यावेळी सांगितले.
त्यामुळे घरी बसून व्हिडिओ रेकॉर्ड करून मतदान करता येणार आहे. कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे असे ही त्यांनी म्हटले आहे.