तुमच्या खात्यात अनुदानाचे पैसे आले का नाही? नेमके कोणत्या योजनेचे पैसे खात्यात आले जाणून घ्या..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News: सरकारी योजनेअंतर्गत अनेक आर्थिक लाभ देणाऱ्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी अनेक अनुदानाच्या योजना देखील राबवल्या जातात. तुम्ही देखील एखाद्या अनुदानाची वाट पाहत असाल आणि ते अनुदान तुमच्या खात्यात जमा झाले का नाही? किंवा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे नेमके कशाचे आहेत? हे लक्षात येत नाही. अशा वेळेस जे अनुदान येणार होते ते आले का नाही किंवा आपल्या खात्यामध्ये जे पैसे येत आहेत ते कशाचे आहेत? असा प्रश्न निर्माण होतो.

हे पण वाचा | लाडक्या बहिणींच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये या दिवशी जमा होणार; जाणून घ्या तारीख आणि वेळ?

मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निवडक अनुदानाचे पैसे जमा होत आहेत. पिक विमा असेल अतिवृष्टी अनुदान असेल कृषी सिंचन योजना असेल किंवा या व्यतिरिक्त शासनाच्या इतर योजनेचा अनुदान असेल हे महाडीबीटी द्वारे अनुदानाचे वितरण केले जात आहे. दरम्यान मध्ये शासनाचा एक जीआर आला होता. यामध्ये 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे ज्यामध्ये विदर्भ मराठवाडा यासह इतर जिल्हे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे रेशन बंद करून शेतकऱ्यांना रोख स्वरूपात प्रति लाभार्थी प्रतिमा 170 रुपयाच्या अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. Agriculture News

या योजनेच्या माध्यमातून प्रति लाभार्थी अनुदान विस्तारित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात देखील झाली आहे. या सर्व योजनेच्या अनुदानाच्या वितरणामुळे शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे. खात्यात जमा होणारी पैसे नेमकं कुठल्या अनुदानाचे आहेत हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही. तर हे कसे जाणून घ्यायचे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. Payment status

हे पण वाचा | पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे पैसे 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कोणाला मिळणार? यादीत नाव चेक करा

अशा पद्धतीने तपासा कोणत्या अनुदानाचे पैसे आहेत?

  • यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
  • या साइटवरील चौथ्या पर्यावर म्हणजेच पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • नो युवर पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यावर क्लिक केल्यानंतर पुढील विंडोमध्ये पेमेंट बाय अकाउंट नंबर अशी विंडो दिसेल.
  • यात सुरुवातीला आपण वापरत असलेल्या बँकेचे निवडायचे आहे.
  • यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म करण्यासाठी पुन्हा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे.
  • यानंतर खालील बॉक्समध्ये कॅप्चर कोड टाकायचा आहे.
  • यानंतर आपल्याला आधार लिंक मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.
  • त्यानंतर ओटीपी त्या रकाम्यात टाकायचा आहे त्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर आपल्या खात्यावरील माहिती आपल्याला खाली पूर्ण सविस्तरपणे दाखवली जाईल.
  • यात कोणत्या योजनेचे अनुदान कोणत्या दिवशी आले आहे व किती आले आहे? हे सर्व तपशील दाखवला जाईल.
  • अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक अनुदानाची माहिती मिळवता येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!