Ration Card Update: रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडायचा असेल किंवा एखादे नाव रेशन कार्ड मधून काढून टाकायचे असेल, तर याची प्रक्रिया काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नागरिकांना यासाठी सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही कारण आपण घरबसल्या मोबाईल द्वारे एकदम सोप्या पद्धतीने हे काम करू शकता. या नवीन सुविधेच्या मदतीने रेशन कार्ड धारक आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची माहिती सहजपणे घरबसल्या अपडेट करू शकणार आहेत.
मेरा रेशन 2.0
भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने रेशन कार्ड मध्ये नवीन अपडेट करण्यासाठी, एखाद्या नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी किंवा एखाद्या सदस्याचे नाव कमी करण्यासाठी अगदी सोपी आणि सुलभ पद्धत सुरू केली आहे. यासाठी रेशन कार्डधारकांना मेरा राशन 2.0 हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपच्या मदतीने वापर करताना घरबसल्या खालील सर्व सुविधा मिळवता येणार आहेत.
- रेशन कार्ड मध्ये नाव जोडणे: रेशन कार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील एखाद्या नवीन सदस्याचे नाव सहजपणे घरबसल्या रेशन मध्ये समाविष्ट करता येईल.
- नाव काढून टाकने: रेशन धारक कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव रेशीम यादीतून काढून टाकण्यासाठी देखील या ॲपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या करू शकता.
- सर्व माहिती अपडेट: या ॲपच्या मदतीने तुम्ही सर्व सदस्यांची वैयक्तिक माहिती अपडेट करू शकता आणि तुम्हाला रेशन कधी मिळाले व किती मिळाले याची माहिती देखील तुम्ही या ॲपच्या मदतीने घेऊ शकता.
हे पण वाचा | तुमच्या खात्यात अनुदानाचे पैसे आले का नाही? नेमके कोणत्या योजनेचे पैसे खात्यात आले जाणून घ्या..
रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी काय करावे?
रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड वापरकर्त्याला ओटीपी पडताळणी करून मेरा रेशन 2.0 ॲपवर लॉगिन करावी लागेल. त्यानंतर तो आपल्या रेशन कार्डशी संबंधित आवश्यक सर्व बदल करू शकेल. पूर्वी रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात जावे लागत असे. परंतु आता हे सर्व काम रेशन कार्ड धारक मोबाईलद्वारे घरबसल्या करू शकतील. या सुविधेमुळे वेळ आणि श्रम वाचणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये या दिवशी जमा होणार; जाणून घ्या तारीख आणि वेळ?
मेरा रेशन 2.0 हे ॲप कुठे मिळेल?
मेरा रेशन 2.0 हे ॲप तुम्ही अँड्रॉइड मोबाईल वापर करते असाल तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर डाऊनलोड करता येईल. जर तुम्ही आयफोन वापर करते असाल तर तुम्हाला ॲप स्टोअर वरून हे ॲप सहजरित्या घेता येईल. प्ले स्टोअर वरून किंवा ॲप स्टोअरवरून तुम्ही हे ॲप सहज पद्धतीने डाऊनलोड करून लॉगिन करून यामध्ये रेशन कार्ड अपडेट करू शकतात. Ration Card Update
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे; अजित पवारांनी केले मोठं वक्तव्य..
अर्ज मंजुरी कशी होणार?
रेशन कार्डधारकांनी या याद्वारे जर नाव जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी अर्ज केल्यावर ती संबंधित विनंती अर्ज जिल्ह्याच्या अन्न व पुरवठा अधिकाऱ्याकडे ऑनलाइन पद्धतीने पाठवला जाईल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर रेशन कार्ड अपडेट केले जाईल. मेरा रेशन 2.0 मळे नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड मध्ये कोणताही बदल करता येणार आहे. घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला अवघी काहीच कालावधी लागणार आहे. पूर्वी या कामासाठी अनेक वेळ लागायचा आणि पूर्वीच्या तुलनेत आता ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे.