Beneficiary Status: प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लवकरच या योजनेचा पुढील हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये महाडीबीटी द्वारे जमा करणार आहेत. कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेले माहितीनुसार पी एम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचा लाभ हा 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकत नाही? या योजनेतून दरवर्षी किती पैसे शेतकऱ्यांना मिळतात? आणि तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे कसे तपासायचे? याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
हे पण वाचा | स्वस्तात सोने खरेदी करायची सुवर्णसंधी! सोन्याचे नवीन दर ऐकून ग्राहकांची दुकानात गर्दी..
लाभार्थी यादी कशी तपासावी?
पी एम किसान योजनेची लाभार्थ्यांची तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. होम पेजवरील शेतकरी कॉर्नर विभागाअंतर्गत पीएम किसान लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकाव्या लागेल. हप्त्याची स्थिती पाहण्यासाठी गेट डाटा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर पी एम किसान योजनेची लाभार्थी यादी दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. Beneficiary Status
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे; अजित पवारांनी केले मोठं वक्तव्य..
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय?
भारतातील 80 टक्के लोकसंख्या अजूनही आपली उपजीविका भागवण्यासाठी शेतीवर अवलंबून आहेत. देशातील लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना सुरू केली आहे. ही एक केंद्रीय योजना आहे जी भारत सरकारकडून 100% निधी शेतकऱ्यांना देते. या योजनेअंतर्गत भारत सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. भारत सरकार आधारसोबत जोडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवते. अशाप्रकारे प्रतिवर्षाला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्यांना दिली जाते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश देशातील गरीब आणि होतकरू शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. ज्याच्या नावावर शेती योग्य जमीन आहे अशा सर्व जमीन धारक शेतकरी कुटुंब यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान येत्या 24 फेब्रुवारी रोजी या योजनेचा 19 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार या ठिकाणावरून जमा केला जाणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना 2,100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? आली मोठी अपडेट समोर..
19 वा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी आवश्यक
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 वा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना इ केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची इ केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्याच शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल ई केवायसी कशी करावी? शेतकरी मित्रांनो ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या ठिकाणावरून तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. किंवा जवळील सीएससी केंद्रामध्ये जाऊन देखील तुम्ही या योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.