Friday

14-03-2025 Vol 19

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 50 हजार रुपये अनुदान या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural loan in india: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान देण्यासाठी विशेष मोहीम चालवली जात आहे. एकही पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये असे निर्देश महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहेत.

पुर अनुदान वाटप कारवाई व पिक विमा योजनेचे अंमलबजावणी आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आहे. नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला भरपाई मिळावी. पंचनामा प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या व गैर व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा

राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन पर अनुदान मिळावे. यासाठी स्वतंत्र मोहीम राबवून काळमर्यादित करावे असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे तिथे पांदन रस्सा तयार करण्याचे काम करावे असेही ते म्हणाले. तसेच शिव रस्त्यावर कारवाई करताना महसूल विभागाने पोलिसांच्या उपस्थितीत मागणी केल्यास ती वेळेवर उपलब्ध व्हावी.

पोलीस निरीक्षकांनी सुरक्षा पुरवण्याचे अधिकार असावेत परवानगीसाठी प्रत्येक वेळी फाईल जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्याची गरज नसावी

जेणेकरून कारवाई करताना गती मिळू शकेल. वळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. लिलाव प्रक्रिया आयोजित करताना जीएसटी सारख्या सर्व बाबी स्पष्ट केलेल्या असाव्यात. आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसेच ई श्रेणीतील जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा परिषदेने कारवाई त्वरित करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *