Anandacha shidha : महाविकास आघाडीचे सरकार कोसळलेल्या नंतर राज्यात शिवसेना म्हणजेच, एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन युती सरकारची स्थापना केली. सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे सरकारने अनेक कल्याणकारी आणि जनहितांचे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, व डॉक्टर आंबेडकर जयंती आणि गौरी गणपती यांसारख्या महत्त्वाच्या सणानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा देखील निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील गरीब व गरजू रेशन कार्ड धारकांना या आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत मात्र शंभर रुपयात तेल, साखर, पोहे, डाळ यांसारख्या वस्तू दिल्या जात आहे.
गोरगरीब जनतेचा सण गोड होत आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेला गरिबांनी चांगला प्रतिसाद देऊन, शासनाची ही योजना सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय बनवली आहे.
दरम्यान आगामी वर्षात म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. शिवाय राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी आनंदाचा शिधा ही योजना वर्षभर राबवण्याचा निर्णय घेतला जात आहे.
शिंदे सरकारकडून याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले, आहेत. या पार्श्वभूमीवर आता अन्न नागरी व पुरवठा विभागाकडून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार केलां जात आहे. वृत्त एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आले आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या वर्षी जून महिन्यात शिंदे सरकार राज्यातील सत्तेवर विराजमान झालें असता, सत्ता स्थापित केल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच ऑक्टोंबर 2022 मध्ये म्हणजेच, दिवाळीच्या काळात शिंदे सरकारने आनंदाचा शिधा ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला.
शंभर रुपयात गोरगरीब जनतेला आनंदाचा शिधा मिळाला. यानंतर सरकारने गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त हा सिद्धा विपरीत केला. यंदा गौरी गणपतीच्या सणाला आणि दिवाळीला देखील असे देण्यात आला आहे.
आता ही योजना सणासुदी व्यतिरिक्त पण राबवण्याचा निर्णय घेतला जाणार असून, ही योजना पुढील एका वर्षासाठी राज्य शासनाकडून राबवली जाऊ शकते. असा अंदाज आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आनंदाचा शिधा योजनेअंतर्गत 350 रुपयांचे वस्तू फक्त शंभर रुपयात दिली जात आहे. मात्र आता ही योजना पुढील एका वर्षासाठी नियमित सुरू केली, तर आनंदाचा शिधा हा मोफत दिला जाईल. अशा आषेचा प्रस्ताव तयार होत असल्याचे, सांगितले जात आहे.
निश्चितच जर शासनाने पुढील एका वर्षासाठी आनंदाचा शिधा योजना सणासुदी व्यतिरिक्त देखील, राबवण्याचा निर्णय घेतला. तर गोरगरीब जनतेला यामुळे मोठा दिलासा व फायदा होईल.