Cotton Rate | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडला होता. शासनाने याबाबत आता मोठा निर्णय घेतलेला आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडवणीस यांनी मंत्रिमंडळामध्ये याविषयी माहिती दिली.
मराठवाडा खानदेश विदर्भ या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कापूस पिकाचे उत्पादन घेतात. परंतु शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून शेती कशी करायची असा प्रश्न सरकार समोर नेहमी मांडत होते. केलेला खर्चही निघत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी होणार या भीतीने टोकाचे पाऊल उचलतात.
परंतु आज झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. प्रमुख शेतमालाचे दर हमीभाव अपेक्षा कमी आहे व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट होत आहे. शेतकऱ्यांना कोण वाली आहे असा प्रश्न शेतकरी वर्गांमधून नेहमी उपस्थित होत आहे.
राज्यातील शेतमालाचे प्रमुख दर हमीभावापेक्षा कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. खानदेश मध्ये सध्या कापूस सोयाबीन व मका या पिकाचे दर हमीभाव पेक्षा कमी आहेत.
व्यापारी एमएसपी पेक्षा कमी किमतीमध्ये कापूस खरेदी करीत होते यासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे निर्णय दिले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी सांगितले की जे व्यापारी MSP पेक्षा कमी दराने कापूस खरेदी केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. व कापसाचे भाव वाढणार का याकडे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.