या भागात मुसळधार पावसाची शक्यता, तर महाराष्ट्रावर ही अवकाळी पावसाच संकट

0
Weather Today

Weather Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Today | देशातील हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. देशामध्ये सध्या थंडीची लाट पसरली असताना पुढील 48 तासामुळे देशातील वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. बांगलादेश वर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 की मी पर्यंत पसरल्यामुळे माणसांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्या काळामध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबतच महाराष्ट्रावर ही अवकाळी पावसाचा संकट घोंघावत आहे.

पुढील 48 तासात पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बांगलादेश दक्षिण भारतात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र पसरले आहे. याचाच परिणाम देशातील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जाणवणार आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमान दोन अंश ते तीन अंशांनी घसरलेले आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये उत्तर प्रदेशच्या काही भागात थंडीचा जोर वाढणार आहे. 23 ते 25 जानेवारी देशात विविध भागात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 22 जानेवारीला उत्तराखंड येथील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता ?

देशभरासह राज्यात ही हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पूर्व विदर्भामध्ये 22 जानेवारी नंतर पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुढील काही दिवसात पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. 22 जानेवारी ते 23 जानेवारी विदर्भात काही ठिकाणी तुरळात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!