IMD ने दिला पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी इशारा; शेतकऱ्यांना काळजी घेण्याची आव्हान सविस्तर आंदाज जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IMD Weather Update : खरंतर राज्यात परिस्थिती वेगळीच निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यात पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. तर काही ठिकाणी अधून मधून सरी पडतात. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यासाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. IMD Weather Update

गेलं काही दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. आणि याच मुळे शेतीकामांना मोठा वेग आलेला होता. परंतु अचानक आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झालेले आहेत. आता शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे पाऊस कधी पडतो आणि आम्हाला कधी दिलासा मिळतो. यामुळे येणाऱ्या हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवणे शेतकऱ्यांना गरजेचे आहे तर नवीन अंदाज काय हे एकदा पाहूया.

हवामान खात्याचा या जिल्ह्यांनाही मोठा इशारा

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, आज जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या पाच जिल्ह्यांना काही ठिकाणी मेघगर्जनासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.

या अंदाजनुसार, दुपारनंतर आणि सायंकाळच्या वेळेस स्थानिक वातावरणामुळे ढगांची निर्मिती होऊन काही ठिकाणी अचानक पाऊस पडू शकतो. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये देखील परिस्थिती काही वेगळी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढत होता, परंतु आता पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावर निर्माण झालेले आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, आणि काही भागात तुरळ हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती दिली. गेले काही दिवसात पावसाचा जोर पाहता तुलने आज पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे.

आजचा अंदाज मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी खरंच दिलासादायक ठरू शकतो. काही जिल्ह्यात परिस्थिती अधिकच बिकट होत चाललेले आहे. बीडमध्ये देखील मोठा पावसाचा खंड पडताना दिसत आहे आता पाऊस कधी पडतो आणि राज्यात पावसाची पुन्हा आगमन कधी होते याची आतुरता आता शेतकरी लागलेली आहे हवामान खात्याचा पुढील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला.

( माहितीस्त्रोत : वरील माहिती ही प्रसार माध्यमाने हवामान खात्याच्या अपडेटच्या आधारे आहे.)

हे पण वाचा : पंजाब डक नवीन हवामान अंदाज : पंजाबराव म्हणतात या तारखेला पडणार अवकाळी पाऊस

Leave a Comment

error: Content is protected !!