Punjab Duck Weather Forecast : सध्या राज्यामध्ये विविध ठिकाणी पिकांची काढणी सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक म्हणतात राज्यात जानेवारी महिन्यापासून अवकाळी पाऊस सुरू होणार आहे. राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ तूर हार्वेस्टिंग ला वेग आलेला आहे. व काही ठिकाणी तर म्हणजे उत्तर महाराष्ट्रात कांद्याची काढणी सुरू आहे.
तर राज्यातील काही भागांमध्ये कापूस वेचणी देखील सुरू आहे. विदर्भ व मराठवाडा मध्ये कापूस वेचण्याची कामे सुरू आहेत याशिवाय रब्बी हंगामातील पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत.
अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी व काळजी करणारी बातमी समोर आलेली आहे. नेहमीप्रमाणेच ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव यांनी जानेवारी 2024 मध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वास असे म्हटले जातात. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे राज्यातील काढणीसाठी आलेला शीत पिकांचे आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.
या भागात पडणार मुसळधार पाऊस
शेतकऱ्यांचे विश्वासू ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी दिलेला माहितीनुसार राज्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे. या कालावधीत अजातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
तीन जानेवारी ते 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणारा असा महत्त्वाचा अंदाज पंजाबराव यांच्या माध्यमातून समोर आला आहे.
परिणामी राज्यातील मराठवाडा व विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेत पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
खरं राव काही पाऊस हा वादळी स्वरूपाचा असतो. यामुळे या कालावधीत पशुधनाचे आणि शिक्षकांची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. तथापि पंजाब यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का हे विशेष या गोष्टीकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार, पुढील महिन्यात अर्धाच जानेवारी 2024 मध्ये पहिल्या आठवड्यातच अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केलेला आहे.