Today’s Milk Price: दूध उत्पादन खर्चात झालेली बरसात वाढ आणि त्या तुलनेत उत्पादनात झालेली घट यामुळे शेती परवडत नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून होतं शेतकरी दूध व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. मात्र आता तेही व्यवसाय परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी ओरड केली आहे. कारण पशुखाद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दुसरीकडे मात्र दुधाच्या दारात घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीसह हा शेतीपूरक व्यवसाय देखील परवडत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.
शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी अनुदान मिळावे
दुधाचे दर कमी झाल्याने शासनाने सहकारी दूध संघात दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देणार असल्याचे सांगितले आहे. परंतु काही परिसरात कुठेही सहकारी दूध संघ उपलब्ध नाही. त्यामुळे तेथील सर्व शेतकरी खाजगी डेअरीला दूध देतात. सरकारच्या या निर्णयामुळे या अनुदानाचा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. नुकसान सहन करावे लागत असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अनुदान लाभ मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Today’s Milk Price
शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी पूर्णपणे कोण मडला असून, बाजारात त्याच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही हीच त्याची मुबलक अपेक्षा आहे. शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्याची मेहनत देखील व्यर्थ जात आहे. शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळावी ही आमची मागणी आहे.
दूध व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे आम्ही दूध देखील खाजगी डेअरीला देतो 3.5 ते 8.5 च्या दुधाला पूर्वी 34 रुपये भाव मिळत होता. परंतु मागील काही दिवसापासून दुधाचे दर 30 रुपयाहून कमी झाले आहेत, त्यामुळे दूध व्यवसाय परवडत नाही. जनावराला लागणार हिरवा चारा, कडबा, सरमाड, मका, भरडा, पेंड आधी पशुखाद्य चे भाव खूप वाढले आहेत.
अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइन करा