Ration Card New Name : राशन कार्ड हे शासकीय कामासाठी आता एक महत्त्वाचे दस्तावेत बनले आहेत. समजा हे दस्तावेज आपल्याकडे नसेल किंवा आपल्या कुटुंबाचे त्या दस्तावेजावर नाव नसेल तर अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कधी जे काम लगेच गरजेचे असतं ते पूर्ण होत नाही. जर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबाचे किंवा लग्न झाल्यानंतर पत्नीचे किंवा घरातील नव्या बालकाचे नाव रेशन कार्ड वरती लावायचे असेल, तर कसं समाविष्ट करायचा हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडलेला असतो. सुदैवाने ही प्रक्रिया फार अडचणीची नाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही हे काम सहज पूर्ण करू शकता. त्यासाठी आपले सरकार (Aaple Sarkar) च्या अधिकृत पोर्टलचा वापर करता येतो, किंवा जवळच्या सेतू केंद्रात अथवा तहसील कार्यालयात देखील थेट अर्ज करता येतो. Ration Card New Name
रेशन कार्ड मध्ये बाळाचे नाव लावण्यासाठी लागणारे कागदपत्रे?
घरामध्ये नव्याने जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड समाविष्ट करायचा असल्या पुढील कागदपत्र आवश्यक आहे. यामध्ये बाळाचा जन्म दाखला, दोन्ही पालकांचा आधार कार्ड.
नवीन रेशन कार्ड मध्ये पत्नीचे नाव लावण्यासाठी लागणारे कागदपत्रे
तुमच्या लग्नानंतर तुमच्या रेशन कार्ड वरती पत्नीचे नाव लावण्यासाठी पुढील कागदपत्रांची गरज असते. यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र, माहेरच्या रेशन कार्ड वरून नाव कमी केल्याचा दाखला, पतीचे मूळ रेशन कार्ड,
रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन पद्धतीने नाव कसं समाविष्ट कराल ?
– सर्वात प्रथम तुम्हाला आपले सरकार (Aaple Sarkar) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचं युजर प्रोफाईल तयार करा आणि लॉगिन करा.
– पोर्टलच्या होम पेजवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हा पर्याय निवडा.
– त्यानंतर शिदेपत्रिकेत नवे नाव समाविष्ट करणे या पर्यायावर ती क्लिक करा.
– अर्जामध्ये नवीन सदस्याची आणि कुटुंबाची विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरा.
– आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या (PDF किंवा JPEG) प्रति अपलोड करा.
– अर्ज सबमिट केल्यानंतर मिळणारे ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर जपून ठेवा पुढील टेटस तपासण्यासाठी हाच क्रमांक उपयोगी पडतो.
रेशन कार्ड ऑफ लाईन पद्धतीने नाव समाविष्ट करा?
– तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा तहसील कार्यालयामध्ये अन्न व पुरवठा विभागाशी संपर्क साधा.
– त्या ठिकाणी रेशन कार्ड नाव वाढवण्यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज ( फार्म क्रमांक 3 ) घ्या.
– अर्ज पूर्णपणे भरून, त्यासोबत वर्णमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षीत प्रति जोडा.
– भरलेला अर्ज संबंधित कार्यालयात जमा करा.
-कार्यालयाकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्ड समाविष्ट केला जाईल.
( टिप: वरील माहिती आपले सरकार या महाराष्ट्र शासनाच्या अगोदर पोर्टलवरील प्रक्रियेवर आधारित आहे. काही अडचण असल्यास नजीकच्या शेतुक केंद्रात किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.)
हे पण वाचा : रेशन कार्ड हरवले? मोबाईलवर फक्त ५ मिनिटांत डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड