Weather Alert: राज्यातील या 14 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा 23 जून पासून सुरू होणार तुफान पाऊस

0
Weather Alert

Weather Alert

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Alert | जवळपास आता पंधरा दिवस होत आले आहेत आणि पाऊस राज्यातून अचानक गायब झालेला आहे. तो म्हणजे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ होत आहे. शेतकऱ्यांनी बी पेरून टाकला आहे आणि आता आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने पुन्हा पुढील 24 तासात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे येलो अलर्ट दिलेला आहे यामुळे शेतकरी बांधवांनो हा हवामान अंदाज लक्षात घ्यावा. Weather Alert

हवामान खात्याच्या ताज्या अपडेट नुसार, राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये घाटमात्यांवरती ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर या भागात अचानक मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. हाच अंदाज कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे.

तसेच मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 23 जून रोजी एक दोन ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे गेल्या काही काळापासून पावसाने दांडी मारल्याने मराठवाड्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तनात आलेला आहे तसेच घाट माथ्यावर हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

मराठवाड्यानंतर विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तनात आलेला आहे तर आयएमडीने या चारी जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित जिल्ह्यात कुठेही पावसाची शक्‍यता नाही.

आज राज्यात 23 जून रोजी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यात मिश्र वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनाकडे नागरिकांनी लक्ष देणे आणि विशेष काळजी घेणे आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरू शकते.

हे पण वाचा | महाराष्ट्रातील या भागात होणार अतिवृष्टी! पंजाबराव डख यांनी सांगितले स्पष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!