Tur Bajar Bhav | राज्यातील तर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. कारण काही दिवसापासून दबावत असलेले तुर बाजार भाव आता वाढू लागले आहेत. जवळपास पाच बाजार समितीमध्ये तुरदाराने दहा हजारच्या आसपास दर गाठले आहे. बीड, नागपूर, अकोला, लातूर , उस्मानाबाद शहर जिल्ह्यातील मुरूम या पाच बाजार समितीमध्ये तुरीला जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. बऱ्याच दिवसापासून तूर बाजार भाव मध्ये चढउतार पाहायला मिळत होता. परंतु तुरीला चांगला समाधानकारक दर मिळाले आहे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु पुढील येत्या आठवड्यामध्ये ही तेजस कायम राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
तुरीने गाठला दहा हजार भाव (Turi reached ten thousand bhava)
तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कष्टाने पिकवलेल्या पिकाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोला बाजार समितीमध्ये 1855 इतकी तुरीची आवक झाली. कमाल 10285 ते किमान 7500 तर सर्वसाधारण 9000 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. तसेच नागपूर बाजार समितीमध्ये 2280 क्विंटल एवढी तुरी आवक झाली असून, कमाल दहा हजार दोनशे अकरा रुपये तर किमान 8500 रुपये इतका दर मिळाला. तसेच सर्वसाधारण 9000 783 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
नागपूर बाजार समितीमध्ये आज ६५०४ क्विंटल तुरीची आवक झाली. कमाल दहा हजार शंभर ते नऊ हजार सहाशे एक रुपये तसेच सर्वसाधारण व हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. बीड बाजार समितीमध्ये 102 क्विंटल तुरीची आवक झाली असून, कमाल दहा हजार शंभर ते सात हजार दहा तसेच सर्वसाधारण 9538 रुपये क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
उस्मानाबाद मुरूम बाजार समितीमध्ये 2001 क्विंटल तुरीची आवक झाली असून, कमाल दहा हजार पाच ते नऊ हजार दोनशे तसेच सर्वसाधारण नऊ हजार सहाशे तीन रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
तुरीचे दर 11000 चे पार जाणार
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून लवकरच तूर खरेदी होणार आहे त्यामुळे व्यापार्याकडून तुला मागणी वाढली असताच या वर्षी झालेले किमी पाऊस आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे तुर पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे. काही भागात तुरीची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे यंदा तूर उत्पादनामध्ये मोठी घट झालेली नाकारता येणार नाही. याच कारणामुळे तुरीचे दर लवकरच अकरा हजार रुपये प्रति क्विंटल देखील टप्पा ओलांडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.